कृषीवार्ता

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे ऊस पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा – आ.आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे ऊस पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा – आ.आशुतोष काळे

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२२/२३ मध्ये गाळप केलेल्या ऊसाचे प्र.मे. टन रुपये २२५ प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२/२३ मध्ये एकूण ५,२४,९४७ मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. इतर कारखान्यांना कराराने २७,९५९ मे. टन ऊस पुरवठा करून या गळीत हंगामात अशा एकूण ५,५२,९०७ मे. टन ऊसास यापूर्वी पहिले पेमेंट २५०० प्रमाणे ऊस गाळपासाठी आल्यानंतर पंधरा दिवसाचे आत शेतकऱ्यांना अदा केले आहे.शेतकरी आज रोजी अडचणीत आहे.कांद्याला भाव नाही.बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा चाळीत सडू लागला आहे. कापूस व सोयाबीनचे दर देखील कमी झालेले आहे.केवळ ऊस पिकालाच एफ. आर.पी.प्रमाणे हमीभाव मिळतो.त्यामुळे खरीप हंगामात बी-बियाणे,रासायनिक खते इत्यादीसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे.खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिके उभी करण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाचा विचार करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती मे.टन रुपये २२५/- प्रमाणे ऊस पेमेंट देण्याचा निर्णय घेवून सदरचे पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले असून पहिले पेमेंट रुपये २,५००/- व हे २२५/- असे एकूण २,७२५/- रुपये प्रती मे.टन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे