आत्मा मालिक सत्संग मंडळाची दिंडी संपन्न



आत्मा मालिक सत्संग मंडळाची दिंडी संपन्न
संपादक :- रविंद्र जगताप
गुरु पोर्णिमा यावर्षी मोठ्या उत्साहाने कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गुरु पोर्णिमा देशात साजरा होणारा मोठा सण आहे.कोपरगावात आत्मा मालिक संत्सग मंडळाच्या वतिने गेल्या २० वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महादेव नगर गुरुद्वारा रोड खर्डे बिल्डिंग ते जंगली महाराज आश्रम पायी दिंडी संपन्न झाली या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने लहान मुले,महिला भाविक उपस्थित होते.भरपूर पाऊस पडू दे बळीराजा सुखी होऊ दे असा गुरुदेव चरणी आशीर्वाद मागितला या दिंडीचे 20 वे वर्ष होते.दिंडीचे नियोजन ज्येष्ठ मार्गदर्शक श्री खर्डे काका कुलकर्णी काका तसेच देवा मोरे, राहुल भागवत. बाबू काटकर.अतुल दोरकर,पप्पू मोरे.अण्णा मासाळ.रोहन दरपेल.प्रीतम काटकरआदींनी परिश्रम घेतले.



