धार्मिक

गुरु पोर्णिमा निमित्ताने राजेंद्र वाघमारे यांनी घेतले विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मा मालिक केंद्रात दर्शन

गुरु पोर्णिमा निमित्ताने राजेंद्र वाघमारे यांनी घेतले विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मा मालिक केंद्रात दर्शन

संपादक :- रविंद्र जगताप

देशभरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून कोपरगाव तालुक्यात देखील गुरुपौर्णिमा आनंदाने भक्तीमय वातावरणात   साजरी झाली आहे .तालुक्यातील संत जनार्दन स्वामी आश्रम तसेच आत्मा मालिक केंद्र कोकमठाण या ठिकाणी लाखो भाविकांनी गुरुपौर्णिमा निमित्त या ठिकाणी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला आहे .राज्यातून देश विदेशातुन भाविकांनी या प्रसंगी हजेरी लावली होती. कोपरगाव येथे आत्मा मालिक केंद्रात गरु पोर्णिमा निमित्ताने  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच  शिर्डी लोकसभेचे संभाव्य उमेदवार असलेले राजेंद्र वाघमारे राहणार नेवासा यांनी या केंद्रामध्ये उपस्थित राहून दर्शन घेतले आहे .राजेंद्र वाघमारे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय समजले जातात. सध्या राजेंद्र वाघमारे यांचे काँग्रेसमध्ये  शिर्डी लोकसभेचे उमेदवार म्हणून नाव चर्चेत आले आहे. राजेंद्र वाघमारे यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असून नुकतेच त्यांनी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मा मालिक या ठिकाणी  गुरुपौर्णिमा निमित्ताने दर्शन घेतले आहे.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे