धार्मिक

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावरती ‘अवतारलीला आत्मस्वरूपाची’ व ‘आत्मयोग’ या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा संपन्न

 

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावरती ‘अवतारलीला आत्मस्वरूपाची’ व ‘आत्मयोग’ या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा संपन्न

संपादक:- रविंद्र जगताप

गुरूपौर्णिमेच्या पावनपर्वा वरती संत परमानंद महाराज लिखीत अवतारलीला आत्मस्वरूपाची’ व ‘आत्मयोग ‘या ग्रंथांचे प्रकाशन परमपूज्य सदगुरू आत्मा मालिक माऊलींच्या करकमलाद्वारे झाले असून सदर ग्रंथ भविकांसाठी उपलब्ध करण्यात आला. आजपर्यंत परमपूज्य माऊलीकडून नामदीक्षेद्वारे मंत्र देण्यात आला तसेच साधकांना ध्यान आभ्यासाचे तंत्र देखील दिलेल आहे आणि आता विश्वात्मक परिवारासाठी माऊलींनी हे ग्रंथ प्रदर्शीत करून दिल्याने गुरुपौर्णिमेच्या महापर्वाचा हा त्रिवेणी महाप्रसाद झाला आहे. चौदस पौर्णिमेच्या दिवशी नव्याने सुरू करण्यात आलेले आत्मयोग गुरुकुल मधील विद्यार्थ्यांच्या धर्मसंस्काराचा विधी परमपूज्य सदगुरू माऊलीच्या करकमलाद्वारे विधीवतपणे पार पडला. गुरुपौर्णिमेच्या ब्रम्हमुहुर्तावरती या आत्मयोग गुरूकुलातील बाल ब्रम्हचारी व संत परमानंद महाराज यांचे हस्ते सदगुरू पूजन करण्यात आले.

जाहिरात

या गुरूपौर्णिमेच्या ऊत्सवा निमीत्ताने देश विदेशातील लाखो आत्मप्रेमी भाविकांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली. या तिन दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आलेल्या लाखो भाविकांसाठी भोजन, निवासासह सर्व सुविधा आत्मा मालिक ध्यान योग मिशन च्या वतीने मोफत पुरविण्यात आल्या होत्या.कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री प्रकाशभाई मेहता, आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, शासकिय पदाधिकारी यांनी देखील परमपूज्य माऊलींच्या दरबारी उपस्थिती लावून परमपूज्य सदगुरु माऊलींचे दर्शन व आशिर्वाद घेतला. यावेळी आत्मा मालिक ध्यान योग्य मिशनचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष ,सदस्य व सर्व संत, संतमाता तसेच आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व सर्व विश्वस्त मंडळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. उत्सवकाळा मध्ये पोलिस विभागा कडून विशेष सहकार्य मिळाले. देश परदेशातील अनेक सत्संग मंडळांसह शेकडो भाविकांनी देखील या गुरूपौर्णीमा ऊत्सवात सहभागी होवून आत्मानंद प्राप्त करून घेतला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे