महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शासकीय) उत्साहात साजरी”

 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शासकीय) उत्साहात साजरी”

कोपरगाव प्रतिनिधी :-     छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने बुधवार दि.१९/०२/२०२५ रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पहाटे ५.३० वा. महामस्तकाभिषेकचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे यांच्यासह मनोज नरोडे तसेच नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद अशा एकूण ११ उभयंताच्या शुभहस्ते महामस्तकाभिषेक, पूजन, आरती विधीवत संपन्न झाली. सदरील विधीवत पूजा झाल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यगीत गायन करण्यात आले.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
सदर कार्यक्रमा प्रसंगी पहाटे वातावरण शिवमय झालेले होते. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, माजी नगरसेवक संजय जगताप,हाजी मेहमूद शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, अनिल दीक्षित यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, नगरपरिषदेच्या माध्यमिक, प्राथमिक शाळांचे शिक्षक, शिक्षिका तसेच नागरिक उपस्थित होते.
जाहिरात
नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, धबधबे तसेच ध्वनिक्षेपण व्यवस्था करण्यात आलेली होती. याकरिता विद्युत अभियंता सागर रायकर, स्वप्नील जाधव व त्यांच्या टिमने विशेष परिश्रम घेतले. तसेच एम.के.आढाव विद्यालयाचे बाळासाहेब विखे, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे अमित पराई, निलेश बुचकुले व भाऊराव राखपसरे यांनी जयंती सोहळा पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे