वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढले कोपरगावकरांनी डोळ्यांची काळजी घ्यावी-वंचित तालुकाध्यक्ष नितीन बनसोडे
वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढले कोपरगावकरांनी डोळ्यांची काळजी घ्यावी-वंचित तालुकाध्यक्ष नितीन बनसोडे
संपादक:- रविंद्र जगताप
सध्या अनेक नागरिकांना राज्यातील काही भागामध्ये डोळ्यांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.कोपरगावातील नागरिकांनमध्ये देखील हि समस्या दिसून येत आहे.काही तज्ञांच्या मते वातावरणातील बदलामुळे तसेच कमी पाऊस व जास्त उष्णता यातून निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढते. कोपरगाव शहरातील नेत्र हॉस्पिटल मध्ये पेशंट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेव्हा कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी असे आवाहन कोपरगाव तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीनराव बनसोडे यांनी कोपरगावकर नागरिकांना केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरात मागील आठवड्याभरा पासून वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे डोळ्यांची साथ सुरू झाली आहे. ही डोळ्यांची साथीने सध्या हळूहळू हात पाय पसरवायला सुरुवात केली असून त्यावर उपचार करण्यासाठी रोज काही पेशंट नेत्र तज्ञांकडे उपचारासाठी येत आहेत याबाबत नेत्रतज्ञानं कडे याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की “व्हायरल कन्जाक्टिव्हायटिस “या डोळ्याच्या विषाणूजन्य आजारामुळे डोळे लाल होणे खाज येणे असे प्रकार डोळे आल्यावर होत आहे तेव्हा योग्य उपचार व काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा डोळ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच जुलै महिना सुरू झाला आणि डोळ्याची साथ सुरू झाली मात्र मागच्या एक दोन आठवड्यापासून ही डोळ्यांची साथ वाढत चालल्याचे नेत्रतज्ञान कडील गर्दीमुळे दिसून येत आहे तेव्हा डोळे आलेल्या नागरिकांनी शक्यतो करून घराबाहेर पडणे टाळावे तसेच मुख्य म्हणजे घरच्यांपासून दूर राहावे स्वतःचे कपडे व साबण या सह अनेक वस्तूंची देवाणघेवाण होता होईल तेवढी टाळावी असे आवाहन नेत्र तज्ञांनी केले आहे तसेच कोपरगाव नगरपरिषदेने डास व मच्छर चे देखील प्रमाण शहरात वाढल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने शहरातील प्रत्येक प्रभागात औषध फवारणी करावी अशी विनंती नगरपरिषदेला वंचित बहुजन आघाडीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीनराव बनसोडे यांनी केली आहे तसेच डोळ्यांचा आजार जास्त बळावू नये यासाठी देखील नगरपरिषदेने जनजागृती करुन उपाययोजना करावी असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नितीनराव बनसोडे म्हणाले आहे.




