कृषीवार्ता

कोपरगाव सह अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळावी:- गौतम बनसोडे 

कोपरगाव सह अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळावी:- गौतम बनसोडे 

संपादक, :- रविंद्र जगताप

कोपरगाव तालुक्यात तसेच अहमदनगर नाशिक जिल्ह्यात पावसाने यावर्षी दडी मारून बसला आहे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे तर कोपरगाव मध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे कोपरगाव तालुक्यामध्ये तसेच अहमदनगर जिल्हा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा आता संपुष्टात आल्या आहे .अनेक ठिकाणी पिके सुकून गेलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे .पाऊस यावर्षी कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.तीन वर्षांपासून कोरोना काळामुळे शेतकऱ्यांना याचे नुकसान झाले होते. कोरनानंतर जेमतेम बाजारपेठ सुरु होवुन व्यवसायाला सुरुवात झाली होती.मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अती पाऊस पडल्याने अनेक शेतकर्याचे पिके सडुन तर काही ठिकाणी वाहून गेली.  परंतु यावर्षी पावसाने निराशा जनक परिस्थिती निर्माण केल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे शासनाने त्वरित या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  आर्थिक मदत करून त्यांना सहकार्य करावे. शेतकऱ्यांना सहकार्य न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन राज्यात नाशिक नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे शासनाने त्वरित मदत करावी.अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेल निवेदनाव्दारे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गौतम बनसोडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे