ब्रेकिंग

पोलीस उपनिरिक्षक. सुरेश छबुराव आव्हाड , यांची झालेली बदली थांबवावी:-एकलव्य संघटना

पोलीस उपनिरिक्षक. सुरेश छबुराव आव्हाड ,  यांची झालेली बदली थांबवावी:-एकलव्य संघटना

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक श्री. सुरेशजी छबुराव आव्हाड साहेब यांची श्रीरामपूर पोलीस स्टेशनला झालेली बदली तात्काळ थांबवावी यासाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य व आदिवाशी समाज बांधव कोपरगांव यांच्या वतिने आमदार आशुतोष काळे यांना १५ आँगस्ट रोजी निवेदन देण्यात आले आहे. कर्तव्य दक्ष अधिकारी व कायदा सुव्यवस्थेबाबत अतिशय तिक्ष्ण अशी भुमिका बजावणारे अधिकारी म्हणुन ओळखले जाणारे  सुरेश छबुराव आव्हाड साहेब हे गोरगरीब जनतेला नेहमी न्याय देण्याचे कार्य नेहमी बजावत असतात सर्व आदिवाशी समाज बाधवांच्या विनंतीवरुन श्रीरामपुर येथे झालेली बदली तात्काळ थांबुन त्याना कोपरगांव तालुका किंवा शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत करण्यात यावे अशी विनंती सर्व आदिवाशी बांधवाच्या वतीने करण्यात येत आहे.या निवेदनावर भाऊराव पवार,निलेश वाघ,संजय पवार,रघुनाथ माळी,भाऊसाहेब गायकवाड, राजेंद्र पवार,दिपक मोरे,बापू माळी,रामभाऊ भवर ,अविनाश गायकवाड,दीपक सोनवणे, संजय भगत,हिरा सोनवणे,आदिच्या या निवेदनावर सह्या आहेत

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे