महादेवनगर, कोपरगांव येथे रस्त्यावर – स्पिड ब्रेकर टाकावे .
महादेवनगर, कोपरगांव येथे रस्त्यावर – स्पिड ब्रेकर टाकावे .
महादेवनगर भागात सिंमेट काँक्रिट रोड असुन त्या भागातुन अतिषय भरधाव वेगाने मोटर सायकल वाहतुक होते. त्या रोडवर किरकोळ अपघात सुद्धा झाले आहे.लहान मुले नेहमी बाहेर खेळत असतात तरी एखादा मोठा अपघात होऊन जिवित हाणी होऊ शकते. तरी लवकरात लवकर महादेव मंदिरा जवळ व राहुल अशोक भागवत यांच्या घरासमोर अश्या दोन ठिकाणी स्पिड ब्रेकर टाकुण देण्यात यावे अशी मागणी महादेवनगर भागातील रहिवाशी यांनी केली आहे.यासंदर्भात नुकतेच त्यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराव गोसावी यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर राहुल अशोक भागवत अतुल वसंत दोरकर,देविदास गंगाधर मोरे, संदिप आप्पासाहेब थोरात , अजय बाबासाहेब राशनिकर, बाबुराव काटकर,कैलास मोरे,देविदास कांनडे,मच्छिंद्र इश्वरे,अरविंद रोहम,लक्ष्मण गुंजाळ आदिच्या सह्या आहेत




