हरेगावातील घटना म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी होय:- गौतमराव बनसोडे
हरेगावातील घटना म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी होय:- गौतमराव बनसोडे
संपादक :- रविंद्र जगताप
श्रीरामपूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दलित युवकाचा अर्थ नग्न करून झाडाला टांगून मारहाण करण्यात आली असुन या घटनेचा वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव गौतम बनसोडे यांनी या घटनेचा निषेध केला आहे श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव या ठिकाणी दलित तरुणाला मारहाण करण्यात आली आहे या तरुणाला झाडाला उलटे बांधून अर्धनग्न करून जबर मारहाण करण्यात आली आहे यामुळे या घटनेचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे सदरील घटनेचा व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये या तरुणास अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे.कोपरगाव वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव गौतमराव बनसोडे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी पोलीस प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनातील आरोपींना त्वरित अटक करावी असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे


