ब्रेकिंग

“हेल्पिंग हँड्स “या संस्थेच्या वतीने हुशार, होतकरू व गरीब मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत

“हेल्पिंग हँड्स “या संस्थेच्या वतीने हुशार, होतकरू व गरीब मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत

दि .२० ऑगस्ट २०२३ “हेल्पिंग हँड्स “या संस्थेच्या वतीने आज कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हुशार, होतकरू व गरीब मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. शोभाताई सुपेकर,संचालिका मनीलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे या उपस्थित होत्या तर अध्यक्ष म्हणून मा. श्री. सचिन सूर्यवंशी सोा गटविकास अधिकारी (उ- श्रे) पंचायत समिती कोपरगाव हे उपस्थित होते .सदरच्या कार्यक्रमात आज ३८विद्यार्थ्यांना ७ लाख ४० रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले. तर संस्थेच्या वतीने दोन मुलींना १ लाख ४० रु. चे शैक्षणिक कर्जे संस्थेच्या हमीवर उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे यावर्षी एकूण मदत रू. ८लाख ८० हजार देण्यात आलेली आहे. संस्थेने आज अखेर अशा गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थांना एकूण रु ५१ लाख १७ हजार रुपयांची मदत केलेली आहे. केारेाना काळात एका विद्यार्थ्याला मुत्र पिंड शस्त्र क्रियेसाठी १ लाख ७५ हजाराची मदत मिळवून दिली होती.अशा प्रकारे संस्थेची आज पर्यंतची एकूण मदत रूपये ५२ लाख ९२ हजार झालेली आहे.कार्यक्रमास नागरीक बहू संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र (सुधीर) कोयटे यांनी केले व आभार श्री विट्ठल शिंदे यांनी मानले. सीए. दत्ता खेमनर,अध्यक्ष, हेल्पिंग हँड्स, यांच्या मार्फेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे