भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा:- दशरथ सारवान
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा:- दशरथ सारवान
कोपरगाव शहरांमधील निवारा परिसर कोजागिरी कॉलनी मध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर झाला असून हे भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात टोळीच्या संख्येने फिरत आहे वृद्ध बाल यांच्यावर ते धावून येत आहेत नुकतेच अक्षय पवार नामक व्यक्तीच्या शेळीवर सुद्धा या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर देखील हे भटके कुत्रे भुंकतात त्यामुळे अपघात देखील होत आहे तरी सदरील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी जनार्दन कदम नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते दशरथ सरावन यांनी नुकतेच कोपरगाव नगर परिषदेला निवेदन दिले आहे या निवेदनावरे दशरथ श्रावण संतोष बैरागी सुनिता जगदाळे दर्शन गायकवाड लक्ष्मीबाई खरात नंदू मेंगाने सुरेश माळवदे एस एम पठाण रंजना उदावंत रोहन शिंदे सुयोग माळवकर एम एम भारंबे सुवर्णा लवांदे अर्चना घनघाव शिल्पा हाडके आदींच्या सह्या आहेत




