सावळीविहीर खुर्द शाळेत शालेय साहित्य वितरण


सावळीविहीर खुर्द शाळेत शालेय साहित्य वितरण
संपादक:- रविंद्र जगताप
सावळविहीर/- राहाता तालुक्यातील सावळविहीर खुर्द व सावळविहीर फार्म ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना मिशन आपुलकी अंतर्गत दिल्ली येथील साईभक्त याच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात लहान चिमुकल्यांना साईभक्त शांतनु धमिजा व रितू धमिजा यांच्या हस्ते शालेय बॅग सह ,कंपासपेटी,पाणी बॉटल,बूट मोजे,टिफिन बॉक्स व सहा वह्या संच खाऊ वाटप. याप्रमाणे वितरण करण्यात आले धमिजा यांनी मुलांना शैक्षणिक सामाजिक पर्यावरण विषयक माहिती दिली शिक्षणासाठी जिद्द व एकाग्रता का महत्त्वाची आहे मुलांना सांगण्यासाठी अनेक उदाहरणे दिली यापुढे आम्ही मुलांना शैक्षणिक बाबत मदतीचा हात पुढे करेन आश्वासन दिले तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शेटे या कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले ते म्हणाले की जि.प.शाळेत गुणवत्ता यादीत मुलांची वाढ होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने मुख्याध्यापक यांच्या कडून मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अशोकराव जमधडे होते, प्रमुख मान्यवर धमिजा, गोयल परिवार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीम. मीरा सांगळे यांनी केले.


याप्रसंगी श्री. सुशील गोयल, सौ.पूजा गोयल, चि. हार्दिक गोयल,श्री. चंदर गोयल, श्री.गणेश गोंदकर व कुमारी प्रतीक्षा भालेराव,शिक्षक श्री.दत्ता खंडीझोड,श्री विलास आगलावे,श्री संजय त्रिभुवन यांनी भेटवस्तू वाटप कामी सहाय्य केले सावळीविहीर फार्म शाळेचे मुख्याध्यापक संदिप घोलप सर सह विजय खरात जालिंदर खरात भुषण सोनवणे योगेश देसले सुनील सुरळे स्वप्निल चव्हाण मोठ्या संख्येने पालकवर्गाची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक किशोर कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेतील विद्यार्थिनी कुमारी शर्वरी शिंदे व वैष्णवी सुरासे यांनी मानले.




