ब्रेकिंग

साई समर्थ प्रतिष्ठानचे रौप्य वर्षात पदार्पण

साई समर्थ प्रतिष्ठानचे रौप्य वर्षात पदार्पण

रौप्य महोत्सव निमित्ताने गणेश उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव शहरांमधील निवारा भागातील निवारा हाऊसिग सोसायटी येथील साई समर्थ प्रतिष्ठान गेल्या पंचवीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे.नुकतेच 24 वर्षे पूर्ण होऊन 25 व्या वर्षात साई समर्थ प्रतिष्ठानने पदार्पण केले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.या निमित्ताने यावर्षीची गणेश उत्सव कार्यकरणी जाहिर करण्यात आली आहे.अध्यक्ष सागर महाजन,कार्याध्यक्ष कुंदन भारंबे , प्रतिक पाठक,उपाध्यक्ष साई गाडे आयुष कानडे,खजिनदार तुषार भगत अलोक तिवारी,सचिव मंगेश लोंखडे गुरमितसिंग दडियाल,ढोल पथक प्रमुख सचिन जोशी दादु पाटणकर,संघटक राजेंद्र सावतडकर आशिष राजपाल उमेद छुगाणी अशा पद्धतीने गणेश उत्सव कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे.दिनारदादा कुदळे संचालक, कर्मवीर शंकरराव काळे स.सा.का.लि.,कलविंदरसिंग दडियाल मा.शहरप्रमुख शिवसेना ,अनिरुध्द काळे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी. संदीप सावतडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेश उत्सव साजरा होणार आहे.या गणेश उत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असुन मंगळवार दि. १९/९/२०२३ रोजी सायं. ७.०० वा. श्री गणेश मुर्ती मिरवणुक, प्रतिष्ठापना व श्रींची आरती होणार आहे,बुधवार दि. २०/९ /२०२३ रोजी सायं. ७.०० वा.सदिच्छा भेट प. पू. महंत रमेशगिरीजी महाराज – (मठाधिपती, संत जनार्दन स्वामी समाधीस्थान, बेट कोपरगाव) गुरुवार दि. २१।९।२०२३ रोजी सायं. ७.०० वा.श्री साई कथा – ह.भ.प. कैलास महाराज राजगुरू(साई कथाकार, कोपरगाव) यांचे सुश्राव्य वाणीतून साईकथा कार्यक्रम होणार आहे.शुक्रवार दि. २२/९/२०२३ रोजी सायं. ७.०० वा. संत जनार्दन स्वामी महाराज कथा प. पु. महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज (मठाधिपती राघवेश्वर देवस्थान कुंभारी),तर शनिवार दि. २३/९/२०२३ रोजी सायं. ७.०० वा.श्रीरामभक्त हनुमान कथा महंत स्वामी गोवर्धनगिरीजी महाराज (मठाधिपती, सिध्देश्वर देवस्थान, सुरेगाव आणि रविवार दि. २४/९/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. चित्रकला व बुद्धीबळ स्पर्धा (लहान गट / मोठा गट / खुला) रविवार दि. २४/९/२०२३ रोजी सायं. ७.०० वा. डान्स स्पर्धा (लहान गट / मोठा गट / खुला) स्पर्धा होणार आहे सोमवार दि. २५/९/२०२३ रोजी सायं. ७.०० वा. शिव कथा श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष आखाडा परिषद त्र्यंबकेश्वर )पपु. महंत स्वामी संदिपगिरीजी महाराज(अध्यक्ष रोकडोबा देवस्थान येवला) असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार असुन मंगळवार दि. २६/९/२०२३ रोजी सायं. ७.०० वा. होम मिनिस्टर (फक्त महिलांसाठी पैठणी) वैष्णवी पैठणी सारीज्,येवला(प्रकाश पाडले) व तनिष्क ज्वेलर्स (प्रो.संदिप घोडके)सर्व स्पर्धेचे बक्षिस वितरण केले जाणार आहे.बुधवार दि. २७/९/२०२३ रोजी सायं. ७.०० वा. श्री सत्यनारायण महापुजा व महाप्रसाद. वाटप होणार असुन गुरुवार दि. २८/९ । २०२३ रोजी सायं. ७.०० वा. श्रींची विसर्जन भव्य मिरवणुक असुन विशेष आकर्षण श्रीरामभक्त हनुमान देखावा सादर केला जाणार आहे. साई समर्थ प्रतिष्ठानचे सभासद प्रशांत शिंदे,सुनिल शर्मा अजिंक्य तिवारी ,जयेश रंगभाल कृष्णा चव्हाण, प्रमोद बोथरा , चेतन शिरसाठ,योगेश वैरागळ,सिद्धार्थ जवरे, विक्रांत खर्डे, सिद्धार्थ पाटणकर, दिपक राजपुत,गणेश पाटील, संजय सुरवसे ,राहुल हंसवाल ,रविंद्र भुजबळ,गणेश लोखंडे,दिपक गंगवाल,राजु महाराज ,हेमंत वैरागळ मनिष कुवर, प्रशांत महाजन,करण सोनवणे ,स्वप्निल राऊत,अथर्व कुलकर्णी, निरज मोरे, प्रथमेश मोरे,सनी खरात , वेदांत जोशी मिलिंद जोशी, गणेश जोशी, सतिष डुकरे ,अनुप पटेल,विशाल कांगणे विकी रोकडे संजय सातपुते ,वसंत डुकरे,निलेश सपकळ ,अभिनव देशमुख चंदन भारंबे ,गणेश कदम राहुल ससाणे,रॉबीन पोथीवाल,गणेश कदम ,अक्षय शिंदे ,साई वाघ आदर्श खडांगळे ,अभिषेक साळुंके अनुराग देशमुख ,केतन कुदळे , आदि सभासद मंडळ असुन यावर्षी रोप्य महोत्सव आणि गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.

जाहिरात
जाहिरात

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नाही महाराष्ट्रात राहता का?  पाकिस्तानात ,सविस्तर बातमी खालील लिंक दाबा

https://youtu.be/q1DvsD63HTY?si=fC18GI7GbOV9KtTw

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे