ब्रेकिंग

दुष्काळावर मात करून गोदावरी वाहती राहण्यासाठी कोपरगाव मध्ये होणार महागंगा आरती संपन्न.

दुष्काळावर मात करून गोदावरी वाहती राहण्यासाठी कोपरगाव मध्ये होणार महागंगा आरती संपन्न.

संपादक:- रविंद्र जगताप

नतमस्तक होऊ गोदातीरी,दुष्काळावर मात करू भारी या भावनेने आपल्यावर आलेले दुष्काळ संकट हटण्यासाठी आणि पवित्र गोदावरी मातेला पवित्र अहोरात्र जलाने वाहती रहावी यासाठी पवित्र काशीच्या धर्तीवर प्रार्थना करण्याच्या दृष्टीने आपल्या कोपरगावमध्ये दिनांक ११-०९-२०२३ रोजी पवित्र ४ था श्रावणी सोमवार निमित्त गोदातीरी सायंकाळी ७ वाजता महागंगा आरती घेण्यात येणार आहे.यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे व प्रार्थना करावी यासाठी आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
जाहिरात

गोदावरी ही आपल्या कोपरगाव नगरीला लाभलेले वैभव आहे.पाऊस पडला नसल्याने गोदावरी माता अविरत वाहती राहण्यासाठी ही प्रार्थना करण्यात येणार आहे.दुष्काळाच्या झळा सर्वांना सोसाव्या लागत असून गोदा मातेला साकडे घालण्यासाठी ही महाआरती संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून संपन्न होणार आहे.या वेळी संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी २०२३ कमिटी अध्यक्ष स्वप्नील दिलीप मंजुळ,कार्याध्यक्ष आकाश बबनराव वाजे,उपाध्यक्ष समाधान कुऱ्हे,स्वराज सुर्यवंशी,व्यवस्था प्रमुख अर्जुन भगवान मरसाळे,सचिव रविंद्र लचुरे,रुपेश सिनगर,ओम योगेश बागुल,सहसचिव नरेंद्र गोकुळ लकारे,दत्तात्रय कोळपकर,समीर खाटीक,सदस्य – ईलियास शेख,अनिल जाधव,अजय गायकवाड,सिध्दार्थ पाटणकर,भैय्या नागरे,वैभव सोळसे,अभि सुर्यवंशी,अमोल बागुल,समीर सुपेकर,मोनु म्हस्के आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे