आरोग्य व शिक्षण

सरकारने शासकिय शाळा दत्तक देण्याच्या नावावर शिक्षणाचं व्यापारीकरण करू नये..सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

सरकारने शासकिय शाळा दत्तक देण्याच्या नावावर शिक्षणाचं व्यापारीकरण करू नये..सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

कोपरगावात प्रतिनिधी :-  शासकिय शाळा खाजगी कंपन्यांना भाडे तत्वावर (दत्तक) न देता शासनाने स्वता आधुनिककरण करावे सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे संस्थापक अध्यक्ष जयहिंद विचार मंच कोपरगाव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेलच्या माध्यमातून निवेदन दिले आहे या निवेदनात पुढे म्हंटले आहे कि महाराष्ट्रतील सर्व शासकिय शाळांची परिस्थिती हि शासकिय कचखाऊ धोरणाने शैक्षणिक व्यवस्था मोडकळीस काढली गेली असुन अनेक शासकिय शाळा बंद या आधीच केल्या गेल्या आहे या शाळेत शक्यतो ज्या शाळा बंद केल्यात त्या शाळेत झोपडपट्टीतील किंवा अगदी सर्वसामान्यांचे मुलं जे खाजगी शाळेत अवाढव्य फी भरू शकत नाही असे मुलं शिकत असतात सरकारने शासनाने जे अभ्यासक्रम बदल केला त्यामूळे आज त्यात ७० टक्के मुलांना ९ वी इयत्ता मध्ये शिकत असतांना वाचता लिहता येत नाही त्यात महाराष्ट्र सरकार हे खाजगी कंपन्यांना शासकिय शाळा पायाभुत सुविधा आधुनिककरण करण्याची जवाबदारी देणार आहे म्हणजे शासकिय शाळा दत्तक देण्याच्या नावावर शिक्षणाचं व्यापारीकरण करणार आहे त्यात कंपन्या जो पैसा शाळेवर खर्च करणार आहे तो अवाढव्य फी तुन वसुल करेल आणि जे लोक फी भरूच शकत नाही त्यांच्या पिढ्या ह्या अडाणी राहतील मजुर होतील शिक्षणापासून वंचित राहतील म्हणजे आपल्या सरकारला महात्मा फुले, कर्मवीर आण्णा यांच्या विचारांचा कार्याचा विसर पडलेला आहे का..? शिक्षित सुशिक्षित पिढी घडवायची नाही का? श्रेष्ठ कनिष्ठ असा समाजात दरी निर्माण करून गरीबी दारिद्र रेषेचा स्तर वाढवुन काय साध्य करायचं आहे मुळात सरकार नको तिथं अरबो खरबो रूपये खर्च करत शासकिय पैस्याचा अपव्यय करत मंग तो टाळुन खाजगी कंपन्यांना शाळा अधुनिकरण करण्याची जवाबदारी देण्यापेक्षा स्वता शाळा का अधुनिकरण करत नाही जर सरकारकडे शैक्षणिक व्यवस्था अधुनिकरण करण्यास पैसा नसेन तर महाराष्ट्रातील सर्व सामान्य लोक भीकेची झोळी फिरवुन येणाऱ्या दानातुन शाळा अधुनिकरण करण्याकरता सरकारला पैसा पुरवेल पण मायबाप सरकारने शासकिय शाळा ह्या अधुनिकरण करण्या करता खाजगी कंपन्यांना शाळा दत्तक देऊ नये शाळा खाजगी कंपन्यांना अधुनिकरण करण्यास देणे हा निर्णय सर्वसामान्य लोकांकरता घातक आणि शिक्षणाकरिता आयुष्यं पणाला लावणाऱ्या महापुरुषांचा अवमान आहे म्हणुन आम्ही विनंती करतो की महात्मा फुले माता सावित्री, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेऊन जे शिक्षणाचे महत्व आणि श्रेष्ठत्व सिध्द केलं आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा महा मंत्र दिला व शिक्षणा करता ज्या मातेने शिक्षणाचे कर्मवीर अण्णांना आपलं मंगळसुत्र दिलं पण शैक्षणिक कार्य बंद पडु दिल नाही त्यांचा आदर्श घेत मराठी शासकिय शाळा शासनाने स्वता अधूनिकीकरण करावे असे निवेदन पाठवले

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे