राजकिय

घारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काळे गटाच्या सौ.ठकुबाई काटकर बिनविरोध

नवनिर्वाचित सरपंच सौ. ठकुबाई काटकर यांचा सत्कार करून आनंद व्यक्त करतांना आ. आशुतोष काळे गटाचे कार्यकर्ते

घारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काळे गटाच्या सौ.ठकुबाई काटकर बिनविरोध

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव :- कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रामदास जाधव यांनी रोटेशन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक अधिकारी पोहेगावचे मंडलाधिकारी प्रताप कळसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली असून सरपंच पदासाठी आ. आशुतोष काळे गटाच्या सौ. ठकुबाई रामकिसन काटकर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी प्रताप कळसे यांनी सौ. ठकुबाई काटकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी काळे गटाचे सरपंच व सदस्यांनी अविनाश खरात यांना एकमताने उपसरपंच पदासाठी सहमती दर्शविली.नवनिर्वाचित सरपंच सौ. ठकुबाई काटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कीआ. आशुतोष काळे यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जावू न देता सर्व सदस्यांना सोबत घेवून घारी गावचा सर्वांगीण विकास करून टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगितले. सरपंच सौ. ठकुबाई काटकर यांचे माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.  यावेळी काळे गटाचे माजी सरपंच रामदास जाधव, सदस्य संदिप पवार, अविनाश खरात, सौ.कृष्णाबाई पवार यांच्यासह संदीप पवार,कृष्णाबाई पवार,रामदास जाधव,शिवाजी जाधवअविनाश पवारकिरण पवारलक्ष्मण पवारयमाजी पवारविजय पवारसतीश पवारसंदीप पवारसौरभ पवाररामकिसन काटकर,हिरामण त्रिभुवनभानुदास होनमाऊली पवारअनिल पवारराजकिशोर जाधव,सुनील पवारअशोक जाधववसीम पठाण,शिवाजी बर्डेअक्षय झाल्टेमहेश काटकर,किशोर पवारकमलाकर जाधवअनिल गोधडेसुहास पवारसंजय गोधडेअरुण आहेरसुनील पवारसंजय पवारनारायण पवार, कांतीलाल पवारसचिन जाधवशरद पवारभाऊसाहेब खरातगणेश पवारकर्णा पवाररंगनाथ पवारसुभाष चव्हाणरफीक पठाणभाऊसाहेब कांबळेरोहिदास पवार,मच्छिंद्र खरातसंपत खरातप्रताप गायकवाडश्याम नवलेगणेश दरेकर,संदीप नवलेअशोक पवारविरेश पवार,लक्ष्मण जाधवशांतीलाल पवारगुलाब पठाण, अभिषेक गायकवाडप्रताप शिलेदार, परमानंद होन राजकिशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच सौ. ठकुबाई काटकर यांचे अभिनंदन करून गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला.

 आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून मतदार संघाचा कायापालट केला. मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावून घारी गावाच्या विकासासाठी देखील निधी देवून अनेक विकास कामे कायमची सोडविली आहेत.त्यामुळे घारी गावातून आ. आशुतोष काळे यांना २०१९ च्या विधानसभा  निवडणुकीत ८० टक्के मतदान करण्याचा घारी ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.

फोटो ओळ – नवनिर्वाचित सरपंच सौ. ठकुबाई काटकर यांचा सत्कार करून आनंद व्यक्त करतांना आ. आशुतोष काळे गटाचे कार्यकर्ते.

जाहिरात
जाहिरात

 


वन नेशन व इलेक्शन फायदे तोटे जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

या कारणांमुळे मी राजकारणात प्रवेश केला सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
सत्य एक्सप्रेस न्यजच्या व्हाँटसाप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे