भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी सौ.ज्योती बिडवे यांची निवड

भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी सौ.ज्योती बिडवे यांची निवड
संपादक:- रविंद्र जगताप
शिर्डी:- गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी भीमशक्ती रिपब्लिकन सेना महाराष्ट्रभर कामकाज करत आहे या संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब शोषित पीडित वंचित अल्पसंख्यांक बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कामकाज केले जात आहे.भीमशक्ती रिपब्लिकन सेना पक्षप्रमुख मा.आयु. अनिल दगडू कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती रिपब्लिकन सेना महिला आघाडी शिर्डी शहर अध्यक्षपदी आयु.सौ. ज्योती सतीश बिडवे यांची नियुक्ती झाली असुन त्यांना नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष आयु. मा.यशवंत त्रिभुवन साहेब व तालुकाध्यक्ष आयु.मा. राजू भाई खाटीक साहेब यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले त्या प्रसंगी आयु. संजय म्हस्के आयु. साहेबराव मोरे आयु. भावेश दाभाडे असे अनेक कार्यकर्ते तसेच आयु. मोहरा पिंजारी आयु. ताराबाई सोळसे आयु. छाया मस्के आयु. लक्ष्मीबाई सोनवणे आयु. मिराबाई फटांगळे वनिता बनकर संगीता बिडवे हिराबाई गायकवाड लता मोहन सुवर्णा सगट सुनिता बढे रंजना गाढे अलका मोरे उषा सोळशे उषा खरात भावना दाभाडे उषा शेजवळ प्रिया सोनवणे लता सोनवणे असे अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते महिला आघाडी शिर्डी शहराध्यक्ष सौ. ज्योती सतीश बिडवे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अनेक स्तरातून त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.




