धार्मिक

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये  यासाठी रस्ता दुरुस्त करुन रस्त्यांच्या बाजुचे काटे तोडून पुरेशी लाइटची व्यवस्था करावी.:- वहाडणे

जुन्या गंगेत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये  यासाठी रस्ता दुरुस्त करुन रस्त्यांच्या बाजुचे काटे तोडून पुरेशी लाइटची व्यवस्था करावी.:- वहाडणे

संपादक:- रवींद्र जगताप

हिंदूंचा पवित्र नवरात्र उत्सव जवळ आलेला आहे.कोपरगाव शहरातील हजारो महिला-भगिनी-पुरुष भाविक कोपरगाव शहरातून निघून मोहनिराज भागातून जाणाऱ्या रस्त्याने जुन्या गंगेतील देवीच्या दर्शनाला दहा दिवस दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पायी जात  असतात. दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये  यासाठी सदरचा रस्ता त्वरित दुरुस्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या रस्त्याच्या कडेला दोनही बाजूंनी वाढलेल्या काट्या काढून टाकाव्यात. नगर-मनमाड हाय-वेच्या खालून जुनी गंगा देवी मंदिराकडे जाण्यासाठी नवीनच केलेला भुयारी मार्गही चालण्यासाठी तातडीने तयार करून घ्यावा.जनार्दन स्वामी महाराज मंदिर ते जुनी गंगा देवी मार्गही फारच खराब झालेला आहे,त्याचेही काम करून घ्यावे.कोपरगाव शहर ते जुनी गंगा देवी मंदिर मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्यूब लाईट-हॅलोजन लावून वीज पुरवठा करण्यात यावा.गणेश विसर्जन मार्गावर दिवाबत्तीची सोय करा असे आधीच सांगूनही आपण अक्षम्य दुर्लक्ष केल्याने गुरुद्वारा रोड व छ.शिवाजी महाराज पुतळा ते स्वा.सावरकर चौक या भागात अंधार होता.यावेळी असे होणार नाही हीच अपेक्षा.कार्यकर्त्यांनी केली आहे.याा संदर्भाचे निवेेेदन भाजपा वसंत स्मृती कार्यालयाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावी साहेबांना देण्यात आले

जाहिरात

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे