आरोग्य व शिक्षण
चांदेकसारे या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर संपन्न
चांदेकसारे या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर संपन्न
चांदेकसारे प्रतिनिधी:- चांदेकसारे या ठिकाणी दि. १९ सप्टेंबर रोजी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संचलित श्री साईनाथ व साईबाबा रुग्णालय विभाग शिरडी यांच्या वतीने सदर सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या सर्व रोग निदान शिबिरामध्ये चांदेकसारातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे याप्रसंगी सरपंच किरण होन उपसरपंच सचिन होन ग्राम विकास अधिकारी श्री नाडेकर मल्लू होन अर्जुन बोरावके ओमकार आहेर यांच्याच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरासाठी साईबाबा संस्थान हॉस्पिटल येथील डॉक्टर नितीन गर्कळ डॉक्टर सारिका गाडेकर श्री सुनील लोंढे ब्रदर अमोल वाणी ब्रदर संदेश बोराडे ब्रदर अनिल घायदार लिपिक किरण भदाने सुभाष डांगे हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते




