ब्रेकिंग

रामवाडी , संवत्सर येथे बस थांबवा – मुकुंद मामा काळे

रामवाडी , संवत्सर येथे बस थांबवा – मुकुंद मामा काळे

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील संवत्सर, रामवाडी येथे अधिकृत बस थांबा असताना देखील बस चालक थांबत नसल्याने विद्यार्थी व पालकांचे व प्रवासींचे तीव्र नाराजी वाढलेली आहे सदर परिसरात बस थांबा ठिकाणी न थांबल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग सेल आघाडीचे तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी कोपरगाव आगार प्रशासनाला दिले आहे.ग्रामीण भागातुन अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी तसेच प्रवासी व दैनंदिन कामकाजासाठी अनेक नागरिक शहरी भागात येत असतात परंतु अनेक दिवसांपासून रामवाडी व संवर्धन परिसरातील बस थांबा या ठिकाणी बस चालक थांबत नसल्यामुळे तसेच बसेस वेळेवर येत नसल्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपले आगाराचे नियोजन शुन्य कारभार उघड होत आहे. गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. विद्यार्थी विद्यार्थिनी नोकरदार वर्ग यांच्याकडे बसेसच्या पासेस असून त्यांना वापर करता येत नाही. बस थांबा वर बसेस न थांबल्यामुळे खाजगी वाहनांची मदत घेऊन शालेय, महाविद्यालयात नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवा लागत आहे. हे दिलेल्या निवेदनाची दखल घेवून बस थांबा वर बसेस थांबण्याचे सुचना द्यावे. त्वरित न झाल्यास विद्यार्थी विद्यार्थिनी व परिसरातील नागरिकांसह कोपरगाव आगार यांच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील मुकुंद मामा काळे, राजेंद्र बोरनारे, दिनेश बोरनारे, नंदकुमार जगताप, मोहनराव निकम, गणेश काळे, छायाताई काळे, मनिषा बोरनारे यांनी इशारा दिला आहे.

जाहिरात
जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे