ब्रेकिंग

ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी.

ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी.

संपादक:-रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :-   एकेकाळी तमाशाचे फड गाजवणारी ज्येष्ठ तमाशा गायिका व नॄत्यागंना शांताबाई कोपरगावकर यांचा काही दिवसांपूर्वी उदिग्न अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांच्याविषयी सविस्तर फेसबुक वर पोस्ट करून त्यांची हलाखीची परिस्थिती जगासमोर मांडली. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियावर ती बातमी सर्वत्र झळकल्या नंतर शासन, प्रशासन तसेच समाजातील प्रत्येक घटकांकडून निराधार, बेवारस शांताबाई कोपरगावकर यांना मदतीचा ओघ चालू झाला. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ साहेब यांनी प्रत्यक्ष वृद्धाश्रमात जाऊन शांताबाई कोपरगावकर यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांना शांताबाई विषयी जी काही मदत करता येईल ती करा असे आदेश दिले. नुकताच शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब तसेच आजी माजी खासदार, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांचा धनादेश शांताबाई कोपरगावकर यांना सुपुर्द करण्यात आला.
शांताबाई कोपरगावकर यांना वृद्ध आश्रमात दाखल केल्यापासून त्यांच्या डोळ्यावरती शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. शांताबाईंच्या डोळ्यावरती शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते परंतु ती शस्त्रक्रिया गुंतागुंतींची असल्या मुळे त्यांना नाशिक येथील तुलसी नेत्ररोग हॉस्पिटल मध्ये भरती केले. मोफत उपचारासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी केल्यानंतर नासिक येथील तुलसी नेत्ररोग हॉस्पिटलच्या नेत्ररोग तज्ञ डॉ. संगीता काकडे यांनी शांताबाई कोपरगावकर यांच्या डोळ्यावरती यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रिया झाले नंतर शांताबाई कोपरगावकर यांना पुन्हा वृद्ध आश्रमात दाखल केले आहे. यावेळी द्वारकामाई वृध्द आश्रमाचे श्रीनिवास यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे