सामाजिक

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण करण्यासाठी नियोजन करा आ. आशुतोष काळेंच्या सूचना

आमरण उपोषणास बसलेले लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष व मातंग समाज बांधव यांच्याशी चर्चा करतांना आ.आशुतोष काळे

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण करण्यासाठी नियोजन करा आ. आशुतोष काळेंच्या सूचना

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव  :- कोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी नियोजन करून मातंग समाजाच्या उर्वरित मागण्या तातडीने पूर्ण करा अशा आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या आहेत.कोपरगाव शहरातील सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने विविधमागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव व त्यांच्या सहकाऱ्यांचेकोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आमरण उपोषण आंदोलन सुरु असून या उपोषणकर्त्यांची आ. आशुतोष काळे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, सर्व समाजाच्या थोर महा पुरुषांचा मला अभिमान असून त्यांच्याप्रती अपार श्रद्धा आहे.त्याप्रमाणेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्याप्रती देखील श्रद्धा असून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण व्हावे हि माझी मनापासून इच्छा होती व आजही आहे. त्यामुळे मागील वर्षी (दि.६ एप्रिल रोजी) राज्याचे मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामांच्या लोकार्पण व शुभारंभासाठी कोपरगाव येथे आले असता त्यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी नियोजन केले होते. मात्र यामध्ये काही व्यक्तींनी राजकारण आणून हे अनावरण त्यावेळी होवू दिले नाही. त्यामुळे असंख्य मातंग समाज बांधवांसह मला देखील वाईट वाटले. परंतु मातंग समाजाच्या मागणीनुसार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने योग्य नियोजन करावे. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने सुरु करून मातंग समाजाच्या इतर मागण्या तातडीने पूर्ण कराव्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी नगरपरिषद प्रशासनालायावेळी दिल्या.

जाहिरात
जाहिरात

यावेळी उपोषणकर्ते फकिरा चंदनशिव, मच्छिन्द्र शिरसाठ, दौलत शिरसाठ, अनिल जाधव, अनिल पगारे,रविंद्र डोलारे,अर्जुन मरसाळे, सुरेश मरसाळे, राहुल गायकवाड, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर, पद्मकांत कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. राहुल रोहमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, फकिर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, सुनील शिलेदार,विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर,राजेंद्र खैरनार, प्रशांत वाबळे, मुकुंद इंगळे,वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, सुनील बोरा, अॅड. मनोज कडू, आकाश डागा,राजेंद्र आभाळे, शैलेश साबळे, सचिन गवारे, मनोज नरोडे, एकनाथ गंगूले,किशोर डोखे, नंदकुमार डांगे, शुभम लासुरे, महेश उदावंत, अक्षय आंग्रे, आबा आभाळे, इम्तियाज अत्तार, विलास बेंद्रे,अंबादास वडांगळे, संतोष शेलार, लक्ष्मण सताळे, नारायण लांडगे, योगेश वाणी,प्रदीप कुऱ्हाडे, विशाल निकम, संतोष शेजवळ, आकाश गायकवाड, राकेश शहा,मंदार हिंगे, सोमेश शिंदे, जनार्दन शिंदे,हर्षल जैस्वाल, अमोल आढाव, उत्तमराव औताडे, बाबुराव खालकर, शंकर घोडेराव,विजय नागरे, राजेंद्र देवरे, राजेंद्र उशिरे,शाहरुख कुरेशी, मंगेश नाईकवाडे, भरत बोरनारे, हारुण शेख, प्रतिक कांबळे,अनिरुद्ध काळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे