ब्रेकिंग

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन

             संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव:-कोपरगाव तालुक्यातीलसहकारात अग्रेसर असणाऱ्याकर्मवीर शंकरराव काळे सहकारीसाखर कारखान्याचा सन२०२३/२४ या वर्षाच्या ६९ व्यागळीत हंगामाचा बॉयलरअग्निप्रदीपन समारंभ मंगळवार(दि.१७) रोजी सकाळी १०.००वाजता उद्योग समुहाचे मार्गदर्शक व  जेष्ठ संचालक माजी आमदारअशोकराव काळे यांच्याअध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळेयांच्या प्रमुख उपस्थितीतकारखान्याचे व्हा. डॉ. मच्छिंद्र बर्डे  व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.चित्राताई बर्डे यांच्या शुभहस्तेविधिवत पूजा करून होणारअसल्याची माहिती कारखान्याचेप्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.  कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर तसेच कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर शंकररावकाळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मागील वर्षी कारखान्याच्या पहिल्या टप्प्यातील आधुनुकीकरणाचे काम पूर्ण होवून मागील वर्षीचा गळीत हंगाम हा नवीन बॉयलर व नवीन मिलच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पडला आहे. दुसऱ्या टप्यातील बॉयलिंग हाउसचे काम अंतिम टप्प्यात असून  गळीत हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्याच्या या ६९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभबॉयलर अग्निप्रदीपन व विधिवत पूजा करून होणार आहे याकार्यक्रमास सर्व  सभासदांनी वकारखान्यावर प्रेम करणा याहितचिंतकानी मोठ्या संख्येनेउपस्थित रहावे असे आवाहनकर्मवीर शंकरराव काळे सहकारीसाखर कारखान्याचे प्रभारीकार्यकारी संचालक सुनिल कोल्हे व  कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे