प्रशासनाने बिबट्याला त्वरित पकडावे कोपरगावात भीतीचे वातावरण:- गौतमराव बनसोडे
प्रशासनाने बिबट्याला त्वरित पकडावे कोपरगावात भीतीचे वातावरण:- गौतमराव बनसोडे
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव शहरामध्ये भरवस्तीत बिबट्याची दहशत पहावयास मिळत आहे कोपरगाव बस स्टॅन्ड परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार असे दिसुन येते की,काही नागरिकांनवर देखील या बिबट्याने हल्ला केला आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित या बिबट्याला पकडून घ्यावे नुकतेच दिवाळी दसरा सण जवळ आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहे दिवाळीच्या सणांमध्ये छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे .कोरोना नंतर महागाई वाढली त्याचबरोबर अनेकांचे धंदे डबघाईला गेले नुकतेच पावसाने सुद्धा दगा दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा. व त्या बिबट्याला सापळा रचून पकडून घ्यावे जेणेकरून नागरिकांमध्ये भीती दूर होईल दिवाळी दसऱ्याच्या ऐन सणासुदीच्या काळामध्ये बिबट्याची दहशत झाले असून नागरिकांमध्ये भीती झालेली आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर मार्ग काढावा .तसेच नागरिकांना कुठे बिबट्या आढळून आल्यास किंवा दिसल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा तसेच आपल्या लहान मुलांना सांभाळावे वृद्ध नागरिकांनी जपून राहावे त्याचबरोबर तरुणांनी बिबट्या आढळून आल्यास त्याला दगड मारू नये दगडा मारल्यामुळे तो चिडून एखाद्याचा बळी जाऊ शकतो त्यामुळे आपणास कुठे बिबट्या आढळल्यास किंवा दिसून आल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव गौतमराव बनसोडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे


