महाराष्ट्र

पुणतांब्यात .हिदुहदयसम्राट बाळासाहेब  ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

जाहिरात
जाहिरात

पुणतांब्यात .हिदुहदयसम्राट बाळासाहेब  ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तरुण तडफदार उमदे व्यक्तिमत्त्व उमेदवार श्री संदिप वर्पे यांचे हस्ते वंदनीय शिवसेनाप्रमुख.हिंदुह्रदयसम्राट सरसेनापती. बाळासाहेब केशवराव ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधीवत पूजन करून त्यांचे पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे संदिप वर्पे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी बोलताना सांगितले की. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये कार्य करत असताना . वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराने प्रेरित होऊन सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. व भविष्यात ही करत राहिल. बाळासाहेबांचे विचार बाळकडू मला ही मिळाले आहे.२० टक्के. राजकारण ८० टक्के . समाजकारण हेच माझे ध्येय असुन मी या पासुन तुसभरही हलु शकत नाही.मी सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता म्हणून काम करत असताना.आज मला कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील तिनं लाख मतदांरा मधुन तसेच एक ना अनेक मातब्बर मंडळी विधानसभा निवडणुक लढण्याचे तयारीत असताना सुद्धा.माझे नेते राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार साहेब यांनी माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील निष्ठावंत कार्यकर्ताला आज विधानसभे साठी उमेदवारी देऊन.सामान्य जनतेचा सन्मान केला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापने पासुन तळागाळातील सामान्य कुटुंबातील कार्यकर्याचे संघटन उभे करुन त्यांना आमदार. खासदार.मंत्री. लोकसभा अध्यक्ष.जिल्हा परिषद अध्यक्ष.सदस्य.पंचायत समिती सभापती.सदस्य .महापौर . नगराध्यक्ष.नगरसेवक. पदी काम करण्यासाठी संधी निर्माण करुन देऊन सामान्य माणूस नेते पदी नेऊन वंचित गोरगरीब समाजाचे सेवेसाठी तत्पर नेते घडवण्याचे महान कार्य केले.ते कार्य आजही आपलेसाठी कायम प्रेरीत करणारे आहे असे सांगितले.

जाहिरात

पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी आपले मनोगतात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने वयाचे ९ व्या वर्षा पासून प्रेरीत होऊन आज ही आम्ही शिवसैनिक म्हणून निस्वार्थ पणे समाजाची सेवा करत आहे.व करत राहाणार असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदिप वर्पे साहेब. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी.शिवसेना नेते सुहास वहाडणे.राष्ट्रवादीचे छगनराव जोगदंड.जेष्ट शिवसैनिक बाळासाहेब पवार.संदिप पह्रे.किरण सकट. मार्गारेट बोरसे. रमेश पवार.मिलिंद विश्वासराव.शेषराव भुईगंळ.समद सय्यद.पोपट पवार.किरण जगदाळे.संतोष पह्रे.विशाल कचरे.शैलेश गगे. हेमंत कुलकर्णी.साहेबराव गुंजाळ.किशोर बाविस्कर.ज्ञानेश्वर नन्नवरे. सुनिल पवार.दिपक पवार.निकम भाऊ. गोकुळ पवार.दिलीप कापसे.चेतन कापसे. साहेबराव पवार.अनिल पवार.राहुल पवार.काळु गायकवाड.संजय पवार. विलास जगदाळे. राजु मेहेरे.भाऊ शिवदे. शुभम शिंदे . सुमित शिंदे. कैलास स्वामी उदावंत . यांच्या सह अनेक शिवसैनिक व शिवप्रेमी .सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे