क्रिडा व मनोरंजन

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयास यश

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयास यश

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :-दि. 16/12/2022 रोजी  जिल्हा क्रीडासंकुल वाडिया पार्क, अहमदनगर येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय  मैदानी स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. आरती राजेंद्र जगताप हीने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात 400 मी. धावणे या क्रीडा प्रकारात  द्वितीय क्रमांक मिळविला आहे व  पुणे येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे. तीच्या या यशाबद्दल को. ता. एज्यु. सो. चे अध्यक्ष श्री. अशोक रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदिप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे आदींनी अभिनंदन केले, व  पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडू आरतीला  महाविद्यालयाचे शा. शि. संचालक डॉ. सुनिल कुटे व क्रीडा शिक्षक श्री. मिलिदं कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात
जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे