आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून दोन जणांवर गुन्हा दाखल
आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून दोन जणांवर गुन्हा दाखल
ऐन दिपावलीच्या सणात एका विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळाप्रकरणी सासु व नवर्यावर मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दिपाली गुंडगळ या महिलेवर शारिरिक मानसिक त्रास देवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नवरा नामदेव भाऊसाहेब गुंडगळ व सासु शिला भाऊसाहेब गुंडगळ यांच्यावर मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी राजेंद्र वदक यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हटले आहे की मी राजेंद्र रंगनाथ वदक वय 60 वर्ष धंदा चालक राहणार वार्ड नंबर दोन बजरंग चौक श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी फिर्यादित म्हटले आहे की मला चार मुली असून चौघेही विवाहित आहे माझी सर्वात लहान मुलगी दिपाली हिचे सण 26 /8/ 2016 रोजी श्रीरामपूर येथे श्री नामदेव भाऊसाहेब गुंडगळ यांच्याशी विवाह झाला होता नामदेव भाऊसाहेब गुंडगळ राहणार वंजारवाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांच्याबरोबर विवाह झाला तिला एक मुलगा असून जयेश त्याचे नाव आहे पाच वर्षाचा हा मुलगा असून शिवण्या नावाची तीन वर्षाची मुलगी आहे तसेच त्यांच्या घरी तिची सासू शीला भाऊसाहेब गुंडगळ ही देखील राहत आहे दिपाली चे लग्न झाल्यापासून तिला तिचा नवरा व सासू नेहमी मानसिक व शारीरिक त्रास देत होते. त्याबाबत ज्या ज्या वेळेस दिपाली माहेरी श्रीरामपूर येथे आल्यानंतर मला व तिची आई भागीरथी भाऊ निलेश यांना सांगत होती .आम्ही ऐकून घेऊन तुझा नवरा सुधरेल असे सांगून तिला परत सासरी वंजारवाडी येथे पाठवत होतो तिने आम्हाला सांगितले होते की माझा नवरा नामदेव गुंडगळ हा मला मोठी गाडी घेण्यासाठी तुझ्या माहेरी वरून दोन लाख रुपये घेऊन ये माझी मुलगी घरची परिस्थिती गरिबीची असल्याने माझे आई-वडील कुठून पैसे आणणार असे सांगत असे मी सुद्धा जावई नामदेव गुंडगळ यास गाडी घेण्यावरून मुलीला त्रास देऊ नका असे आमची दोन लाख रुपये देणे इतपत परिस्थिती नाही असे सांगितले होतो जावई नामदेव गुंडगळ हा तिला गाडी घेण्यासाठी पैसे आण असा तगादा लावत होता व त्यावरून नवरा मला मारहाण करतो शिवीगाळ करतो व उपाशीपोटी ठेवतो असे मुलगी दिपाली ही आम्हास मोबाईल वरून फोन करून सांगत होती दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी दीड वाजता दिपाली चे नंदई चा भाऊ संजय यमाजी ठोके यांनी मला मुलगा निलेश यास मोबाईलवरून कळवले की दिपाली सिरियस असून ति काय बोलत नाही तिला मालेगाव येथे सिटी हॉस्पिटल ला ऍडमिट केले आहे तू एकटाच मालेगाव येथे ये निलेश याने सदर बाब मला सांगितली त्यानंतर मी माझा मुलगा निलेश असे सायंकाळी पाच वाजता सिटी हॉस्पिटल मालेगाव येथे आलो दिपाली ही दवाखान्यात ऍडमिट होती व तिच्याजवळ तिची नणंद दिपाली नवनाथ ठोके व त्यांचा भाया संजय ठोके हे होते दिपाली व्हेंटिलेटर वर आयसीयू मध्ये होती आम्ही डॉक्टरांना विचारले असता त्यांनी पॉयझन केस आहे असे सांगितले व परिस्थिती नाजूक असल्याने सांगितले त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 13/ 11/ 2023 रोजी आम्ही दिपाली ची परिस्थिती पाहिली असता तिची तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती व ती बुद्धीवर आली नव्हती म्हणून आम्ही रात्री साडेअकरा वाजता प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथे पुढील उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे आम्ही डॉक्टरांना सांगितले डॉक्टरांनी आम्हाला प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथे उपचार कामे घेऊन जाण्यासाठी रेफर कार्ड दिले त्यानंतर आम्ही तिला प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथे घेऊन आलो त्यानंतर तिच्यावर तेथे उपचार चालू असताना दिनांक 14/ 11 /2023 रोजी पहाटे ५ वाजून 55 वाजता ती मयत झाली त्यानंतर तिच्या मृतदेहावर शविच्छेदन करण्यात आले त्यानंतर आम्ही तिचे अंत्यविधी तिच्या सासरी वंजारवाडी येथे केला व आम्ही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे येथे आलो तरी माझी मुलगी दिपाली नामदेव गुंडगळ वय 25 वर्षे हिचा तिच्या सासरी वंजारवाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे तिचा नवरा नामदेव भाऊसाहेब गुंडगळ वय तीस वर्षे व सासू शीला भाऊसाहेब गुंडवळ वय पन्नास वर्षे याने सन २०१६ मध्ये लग्न झाल्यापासून शारीरिक मानसिक छळ केला तिच्याकडे मोठी गाडी घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन या तगादा लावून त्यासाठी तिला मारहाण केली उपाशी पोटी ठेवले तिला आत्महत्या प्रवृत्त केले व त्यांच्या छळाला कंटाळून तिने काहीतरी विश प्राशन केल्याचा तिचा दिनांक 14 /11 /2023 रोजी तिचा मृत्यू झाला असून त्या कामे मी फिर्याद देत आहे या फिर्यादिनुसार नामदेव भाऊ साहेब गुंडगळ वंजारवाडी तालुका नांदगाव त्यानंतर सासू शीला भाऊसाहेब गुंडगळ राहणार वंजारवाडी तालुका नांदगाव यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय दंड संहिता 1860 कलम 306 भारतीय दंड संहिता 1860 कलम 498 भारतीय दंड संहिता 1860 कलम 34 नुसार सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

