राजकिय
बोलकीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या अनिता महाले बिनविरोध
बोलकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाच्या अनिता बाबासाहेब महाले यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच रमेश बोळीज व उपसरपंच अनिता महाले यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला.
बोलकीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या अनिता महाले बिनविरोध
कोपरगांव-तालुक्यातील बोलकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाच्या अनिता बाबासाहेब महाले यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार मनिषा पी. कुलकर्णी होत्या. सौ. अनिता बाबासाहेब महाले यांच्या नावाची सुचना दिपक मधुकर बोळीज यांनी केली. ग्रामपंचायत सदस्य कविता अनिल मोरे, विठठल गंगाधर कडाळे, दशरथ सखाराम शिंदे, वनिता देविदास रोहोम यांनी या प्रकियेत भाग घेतला. नवनिर्वाचित सरपंच रमेश चांगदेव बोळीज, उपसरपंच सौ. अनिता बाबासाहेब महाले यांचा सत्कार करण्यात आला.


सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव महाले याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी मतदार संघाबरोबरच सभासद शेतक-यांच्या उत्कर्षासाठी संजीवनी कामधेनूची स्थापना केली., संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी तत्कालीन सभापती म्हणून कोपरगांव तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावण्यांसाठी विशेष प्रयत्न करत प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबुत केला. बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विकासकामांची माहिती देत ग्रामपंचायत प्रशासनांत गांव विकासाच्या योजनांना प्राधान्य द्यावे म्हणून जो संदेश दिला तो सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी अंगिकारावा. सत्कारास उत्तर देतांना नवनिर्वाचित सरपंच रमेश बोळीज म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतीचा पाया मजबुत करण्यांसाठी जी ध्येय धोरणे घेतली ती नांवलौकीकास्पद आहेत. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पावलावर पाउल ठेवुन सार्वत्रिक विकासाचा जो ध्यास घेतला आहे त्याचे अनुकरण करत बोलकीच्या विकासासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करू. याप्रसंगी माजी उपसरपंच वसंतराव बोळीज, कामगार नेते वेणूनाथ बोळीज, बाबासाहेब किसन महाले, बाबासाहेब बाबुराव महाले, दत्तात्रय भिका बोळीज, दत्तात्रय बाबुराव जपे, मधुकर विठठल बोळीज, जिजाबा बोळीज, वसंत शाहुराज महाले, प्रकाश बोळीज यांच्यासह विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन आभार सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेविका जे. ई. शेलार यांनी मानले.


