महाराष्ट्र

ना.आठवलेंच्या उपस्थितीत कोपरगाव येथे सामाजिक समता परिषदेचे आयोजन:-  अनिल रणनवरे

ना.आठवलेंच्या उपस्थितीत कोपरगाव येथे सामाजिक समता परिषदेचे आयोजन:-  अनिल रणनवरे

माता रमाई जयंती व संविधान सन्मान सोहळा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम

विविध सामाजिक कार्यक्रमातून कोपरगाव येथे ना.आठवले यांच्या उपस्थितीत शनिवार दि.३फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती निमित्त व संविधान सन्मान सोहळ्यानिमित्त सामाजिक समता परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व रिपाईचे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात तसेच युवक जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सचिव दिपकराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारीता मंत्री रामदासजी आठवले साहेब हे स्वतः उपस्थित राहणार असून येत्या लोकसभेच्या दृष्टीने सदर कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय या निमित्ताने रिपाईचे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांच्या संपर्क कार्यालयाचे देखील ना.आठवले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध संविधान अभ्यासक व व्याख्याते विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान तसेच भीमकन्या कडूबाई खरात यांचा भीमगीतांचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री,आजी-माजी आमदार, जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ,आंबेडकरी चळवळीतील विविध नेते, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष अनिल भाऊ रणनवरे यांचेसह सोमनाथ भाऊ लोहकरे,रामदास कोपरे, अकीलभाई शेख, किशोर मैंद, आकाश डोखे, मंगेश मोरे,राहुल सोनवणे,प्रशांत मेहेरखांब,अजित कुशेर,अमोल थोरात,अनिसभाई शेख आदी कार्यकर्त्यांसह तालुका व शहर कार्यकारिणी प्रयत्नशील असून सदर कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे