धार्मिक

मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा ४ नोव्हेंबरला साधुसंताच्या महंतांच्या उपस्थितीत संपन्न होणार

मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा ४ नोव्हेंबरला साधुसंताच्या महंतांच्या उपस्थितीत संपन्न होणार

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या बेट येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा कार्तिक शु!! प्रबोधनी एकादशी शके! १९४४ वार शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी साधू संतांच्या महंतांच्या उपस्थितीत सायंकाळी ०७ वाजता थोर साधुसंतांच्या महंतांच्या अमृतवाणीतून भाविकांना प्रवचनाचा लाभ होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी अहमदनगरचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष व आमदार अशितोष दादा काळे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे गोदावरी खोरे दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे संजीवनी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश दादा पाटील कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव पोलीस उपनिरीक्षक भरतजी दाते पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदी मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे

जाहिरात
जाहिरात

तसेच या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी थोर संतांच्या महंतांच्या उपस्थितीत दिनांक ०१ नोव्हेंबर २०२२ ते ०३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ओम महामृत्युंजय यज्ञ सोहळा तसेच यज्ञाची पूर्णहुती या कार्यक्रमाचे पौराहित्य अनंत शास्त्री लावर गुरुजी हे करणार आहेत तर या सोहळ्याचे सूत्रसंचालन ह.भ.प दत्ता महाराज वैद्य निफाड हे भजन व संगीताचा कार्यक्रमही करणार आहे तेव्हा या सोहळ्यास सर्व गुरुबंधू आणि भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून साधू महंतांच्या अमृतवाणीतून प्रवचन श्रवण करावे असे आवाहन श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान व काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट व स्वामी जनार्दन फ्रेंड सर्कल कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने तसेच अध्यक्ष दत्तात्रय होळकर उपाध्यक्ष विलास कोते पाटील सचिव अंबादास अंत्रे त्र्यंबक (भाऊ) पाटील रामकृष्ण कोकाटे अनिल जाधव आशुतोष पानगव्हाणे संदीप चव्हाण अतुल शिंदे शिवनाथ शिंदे या विश्वस्त मंडळाने केली आहे हा सोहळा भक्तनिवास क्रमांक २ जनार्दन स्वामी आश्रम बेट कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त गुरुबंधू व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश दादा पाटील यांनीही केले आहे.

जाहिराती
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे