आरोग्य व शिक्षण

गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन.

गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन.

कोपरगाव(प्रतिनिधी) : गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी व के.जे. सोमैया मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर, सोमैया आयुर्विहार मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकरवाडी येथे रविवारी (ता. १८) सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबिर होईल. गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी चे डायरेक्टर श्री. सुहास गोडगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन होईल. मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, क्षयरोग आदी आजारांबाबत निदान व उपचार केले जाणार आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल सर्जन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्ररोग चिकित्सा आदींबाबत निदान व उपचार केले जाणार आहेत. या शिबिरामध्ये मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. शिबिराला उपस्थित राहणाऱ्यांनी आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी चे जनरल मनेजर श्री. प्रवीण विभूते तसेच के.जे. सोमैया मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर, सोमैया आयुर्विहार मुंबई च्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिनू यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे