संस्कृत संभाषण मोफत शिबिराचे आयोजन..
संस्कृत संभाषण मोफत शिबिराचे आयोजन…
संस्कृतभारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत वतीने संस्कृत संभाषण मोफत शिबिराचे कोपरगांव आणि शिर्डी येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्कृत भारतीचे मयुर कुलकर्णी यांनी दिली आहे.संस्कृत भारती वतीने कोपरगांव आणि शिर्डी येथे प्रथमच हसत खेळत संस्कृत बोलायला शिकवले जाणार आहे.संस्कृत भाषेतील अनेक संदर्भ समजून घेतांना,उच्चार- संभाषणात कठीण जाते.अशा वेळी हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे.सर्व भाषांची जननी म्हणून ओळखली जाणारी, अत्यंत समृध्द आणि मधुर अशी संस्कृत भाषा अतिशय सोप्या पद्धतीने शिकण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. संस्कृत विषयाचे तज्ञ येथे मार्गदर्शन करणार आहे. शिबीरात १५ वर्षांपुढील कोणीही सहभागी होवू शकतात. मात्र नावनोंदणी आवश्यक आहे.

सदर शिबीर शिर्डी येथे १९ जुन ते २८ जुन २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत श्री साई कोचिंग क्लासेस, साई किमया गार्डन जवळ, विठ्ठलवाडी, नांदुर्खी रोड, शिर्डी येथे होणार आहे.तर कोपरगांव येथे १ जुलै ते १० जुलै २०२४ कालावधीत सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत शिशू विकास मंदिर, विद्याप्रबोधीनी,शाळा, गजानन नगर, कोपरगाव येथे होणार आहे. हे शिबिर निःशुल्क असुन या शिबिरांसाठी संस्कृतचे पूर्वज्ञान असण्याची आवश्यकता नाही.नावनोंदणीसाठी लिंक – https://bit.ly/3mg7vmZ अर्ज सादर करावा. शिबीर संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क -शिर्डी करिता प्रा.अनिता माळी ९८५०१४७३४०,कोपरगांव करिता संपर्क सुशांत आर्ट्स अॅण्ड पब्लिसिटी (घोडके पेन सेंटर),बिरोबा चौक कोपरगांव सुशांत घोडके – ९४२३१६६१०३ येथे संपर्क साधावा.या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी संस्कृत संभाषण शिबिरात सहभागी व्हावे. असे आवाहन संस्कृत भारती महाराष्ट्र प्रांत वतीने करण्यात आले आहे.




