राजकिय

ना. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून जेऊर कुंभारीचा पाणी प्रश्न मार्गी – सौ. अनुसयाताई होन

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनेचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून अनेक गावातील पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या असून जेऊर कुंभारीचा देखील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही ना. आशुतोष काळे यांनी जेऊर कुंभारीच्या ग्रामस्थांना दिली होती. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्यातून जेऊर कुंभारीच्या नळपाणी पुरवठा योजनेस ९ कोटी ९२ लाख ३१ हजार रूपये निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्यामुळे जेऊर कुंभारीच्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरला जाणार असल्याचे पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.अनुसयाताई होन यांनी म्हटले आहे.मागील पाच वर्षात अनेक गावातील पाणी पुरवठा योजना रखडल्या होत्या. त्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबत ना. आशुतोष काळे यांनी निवडून येताच या पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करून केला होता. त्या पाठपुराव्यातून अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांना निधी मिळविण्यात ना. आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. जेऊर कुंभारीच्या देखील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिलेला शब्द पूर्ण करून महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण कायमची थांबविल्याबद्दल जेऊर कुंभारीच्या ग्रामस्थांच्या वतीने सौ.अनुसयाताई होन यांनी ना. आशुतोष काळे आभार मानले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे