राजकिय

काकडी एअरपोर्ट कोपरगाव येथे नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न

काकडी एअरपोर्ट कोपरगाव येथे नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न

संपादक :- रविंद्र जगताप

 काकडी एअरपोर्ट कोपरगाव येथे नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला असुन यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती युवा जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे कोपरगाव अनिल भाऊ रणनवरे सोमनाथ भाऊ लोहकरे ता.सल्लागार ,
फकिरा भाऊ चंदनशिव ता.उपाध्यक्ष अमोल भाऊ थोरात शहर उपाध्यक्ष दक्षिण. कोपरगाव पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळेस युवक जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे व अनिल भाऊ रणनवरे काकडी गावचे सरपंच उपसरपंच व सदस्य या सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

व नंतर आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहता तालुका संघटक विद्रोही सत्यजित कोळगे यांची मुख मैदानी तोफ धडकली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची चळवळ कशी उभी राहिली कसे आणि आठवले साहेबांनी कसं यश संपादन केलं या गोष्टी अनेक सांगितल्या जेव्हा सत्यजित कोळगे बोलले लोक पहिले म्हणायचे आम्हाला आठवले साहेबांचे आणि तुमच्या पक्षाचे किती आहे आमदार पण आता मी सांगतो त्यांना नागालँड मधी जाऊन बघा तुम्ही आमच्या पक्षाचे एक नाही दोन आमदार असं म्हणतात कार्यकर्त्या टाळ्यांचा कळकट झाला.आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागालँड मध्ये रिपाई गटाचे दोन आमदार प्रचंड मताने निवडून आले आपण ही निवडणूक स्वबळावर लढवली कोणत्याही पक्षाचा आपल्याला तिथे पाठिंबा नव्हता तरी तिथे आपले दोन आमदार निवडून आले.. ही तर सुरुवात आहे अभी महाराष्ट्र के इलेक्शन बाकी है आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्येही महाराष्ट्र मध्ये ही आपले अनेक आमदार तयार होणार आहे आपण फक्त सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने पक्षाचे काम करायचं व इतर पक्षांना दाखवून द्यायचा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची ताकद… ज्यांना विच्छू चावला तर तो उतरवता येत नाही आणि ते लोक नागाच्या बिळात हात घालण्याचा प्रयत्न करतो.अशा लोकांना पण दाखवून दिलं पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा पक्ष कोणापेक्षाही कमी नाही आमच्याही पक्षाचे आमदार आणि खासदार आहे आणि भविष्यात अनेक तयार होतील… यावेळेस विद्रोही सत्यजित कोळगे यांनी सांगितलं 12 तारखेला राष्ट्रीय कार्य करण्याची शिर्डी येथे मीटिंग संपन्न होणार आहे… आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये राष्ट्रीय पक्षाचा अधिवेशन भव्य आणि दिव्य शिर्डी अहमदनगर मध्ये संपन्न होणार आहे त्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागलं पाहिजे… आठवले साहेबांचं नेतृत्व पूर्ण भारतामध्ये आहे यावेळेस अनेक गोष्टीवर सत्यजित कोळगे यांनी भाष्य केलं… पक्ष काय देतो आपल्याला तर पक्ष आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देतो अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याची ताकद देतो…. आपल्या मतदारसंघांमध्ये अहमदनगर मध्ये दोन जागा राखीव आहे उत्तर मध्ये शिर्डी लोकसभा आणि दुसरी विधानसभा श्रीरामपूर या दोन्ही जागा आपल्या पक्षाने म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने पूर्ण ताकतीने लढणार आहे आता अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे शिर्डी लोकसभा मध्ये खासदार आठवले साहेब पाहिजे… तर विधानसभा श्रीरामपूर मध्ये आमदार सुरेंद्र भाऊ थोरात पाहिजे…. यांना आपल्याला आमदार आणि खासदार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला पूर्ण ताकतीने मैदानात उतरायचं आहे असेही विद्रोही सत्यजित कोळगे यांनी सांगितलं…कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिल भाऊ रणनवरे यांनी मनोगत व्यक्त करत असताना यांनी सांगितलं… रिपब्लिकन पक्षाची भूमिका आणि उद्दिष्टे सांगितली आपल्याला हक्क आणि अधिकारासाठी संघर्ष करावा लागेल…. हक्क मागून भेटत नाही तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो.व नंतर या वेळेस अनेकांनी मनोगत व्यक्त केलं व राहुल विलास सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या.कानिफ भाऊ गुंजाळ भालेराव सर प्रभाकर गुंजाळ मेजर सोनवणे त्याच बरोबर युवा जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे तालुकाध्यक्ष अनिल भाऊ रणनवरे यांनीही शुभेच्छा दिल्या.काकडी गावचे उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे व भाजपचे कानिफ भाऊ गुंजाळ. भालेराव सर प्रभाकर गुंजाळ .विजय सोनवणे.विलास सोनवणे. श्याम भाऊ सोनवणे नितीन भाऊ गायकवाड.सचिन कोळगे. कुमार सोनवणे. अनिल सोनवणे. विजय सोनवणे. समाधान सोनवणे. निलेश सोनवणे. सुमित सोनवणे. तुषार गायकवाड. अवि सोनवणे. बबन सोनवणे. सुभाष सोनवणे. व अनेक मित्रपरिवार उपस्थित होता.यावेळेस या सत्कार समारंभाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व काकडी ग्रामस्थ व मित्रपरिवार उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भाऊ सोनवणे यांनी व कानिफ भाऊ गुंजाळ यांनी केलं. व आभार  कोपरगाव तालुका दक्षिण उपाध्यक्ष राहुल विलास सोनवणे यांनी मानले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे