शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा समन्वयक पदी दडीयाल कोपरगाव तालुका प्रमुख पदी गंगाधर राहणे(कोपरगांव दक्षिण पश्चिम विभाग)संजय दंडवते कोपरगांव पूर्व -उत्तर विभाग)
शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा समन्वयक पदी दडीयाल कोपरगाव तालुका प्रमुख पदी गंगाधर राहणे(कोपरगांव दक्षिण पश्चिम विभाग)संजय दंडवते कोपरगांव पूर्व -उत्तर विभाग)
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाची कार्यकरणी जाहीर
कोपरगाव प्रतिनिधी :- शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. ठाकरे गटानं अहिल्यानगर जिल्ह्यातील पद जाहिर केले असुन त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, सचिव विनायकजी राऊत साहेब यांनी मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोपरगाव शहरातील कलविंदरसिंग दडियाल यांना
मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.दडियाल हे कोपरगाव शहरप्रमुख होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक प्रभावी कार्य केले.विविध आंदोलने व गोरगरिबांच्या समस्या त्यांनी सोडविल्या आहे.आजच्या शिवसेनेच्या कठीण काळात उत्तम संघटन त्यांनी केले.त्यांच्या या प्रभावी कार्यामुळे वरिष्ठांनी त्यांना जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली आहे. या कार्यकरणी मध्ये जिल्हा समन्वयक कलविंदरसिंग दडियाल कोपरगाव विधानसभा अध्यक्ष किरण खर्डे,तालुकाप्रमुख पदी संजय दंडवते (कोपरगाव पूर्व-उत्तर विभाग)तालुकाप्रमुख: गंगाधर राहणे (कोपरगाव दक्षिण-पश्चिम विभाग),सहसंघटक अशोक कानडे (कोपरगाव विधानसभा)सहसमन्वयक राजू भाई शेख (कोपरगाव विधानसभा) असे पदे जाहिर केले आहे.नवनियुक्त पदाधिकार्यांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब ,राजेंद्र मुरलीधर झावरे (मा.नगराध्यक्ष को.न.पा,जिल्हा सहसंपर्कप्रमुख,उत्तरनगर)सनी रमेश वाघ (शिवसेना शहरप्रमुख,कोपरगाव), कैलास जाधव ,पप्पू पडियार, रंजन जाधव,रवि कथले,शेखर कोलते,बालाजी गोर्डे,नितीश बोरुडे, आशिष निकुंभ, राहुल देशपांडे,कुणाल लोणारी, ओम बागुल, निखिल जोशी,बाळासाहेब साळुंखे, अशोक पवार, इरफान शेख, विकास शर्मा, सुनील कुंढरे, राहुल साटोटे, निखिल मढवई,मधू पवार यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.कार्यकरणी जाहिर झाल्यामुळे शिवसैनिकामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्तविक शहर प्रवक्ते राहुल देशपांडे यांनी केले


संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6
नगर मनमाड रोडवर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा



