धार्मिक

नवसाला पावणारी श्री क्षेत्र वारीची ग्रामदेवता आई जगदंबा माता मंदिराचा इतिहास

नवसाला पावणारी श्री क्षेत्र वारीची ग्रामदेवता आई जगदंबा माता मंदिराचा इतिहास

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वारी येथे सव्वा कोस दक्षिण वाहिनी लाभलेल्या पवित्र गोदावरी नदीच्या काठावर असणारे हे श्री जगदंबा माता मंदीर अनेक भाविकांची श्रद्धा असणारे नवसाला पावणारे देवस्थान असुन वारीची ग्रामदेवी असुन परिसरातील अनेक घराण्याची कुलस्वामिनी आहे
या देवी बाबत जुनी जाणकार मंडळी माहीती सांगतात की शेकडो वर्षांपूर्वी वारीचे जहागिरदार रायाजी पाटील शिंदे यांना स्वप्नात येऊन आई जगदंबा मातेने दृष्टांत दिला *” मी गोदावरीच्या तिरावर आलेली आहे आणि भक्तांच्या कल्याणा करीता मी सदैव इकडे राहील मंदीरात माझी स्थापना करावी”* जहागिरदार यांनी त्याकाळातील पंचमंडळ ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या साक्षीने स्वप्नातील दृष्टान्ताप्रमाणे नदी पात्रात मूर्ती शोधली असता ती आढळुन आली सर्व ग्रामस्थांनी पूजा अर्चा करून ही जगदंबा मातेची मुर्ती गावात वाजत गाजत आणुन प्राणप्रतिष्ठा पूजन करून मंदीरात स्थापना करण्यात आली सदरची देवीमूर्ती स्वयंभु असुन आजही या जुन्या मुर्तीचे अवशेष मंदीरात दर्शनासाठी ठेवलेले आढळतात
त्याकाळातील काही जुन्या जाणकार मंडळी यांच्या म्हणण्यानुसार ही देवी मूर्ती मायगाव देवी तालुका कोपरगाव येथुन पुराच्या पाण्यात वाहुन आलेली असल्याचे सांगतात
रायाजी पाटलांचा कालखंड १७७१ पासूनचा असल्याने निश्चितच हे पुरातन मंदीर आहे पुर्वी हे मंदीर मातीकाम अर्थातच कडीपाटी चे होते
मंदिरासमोर साधारणपणे ६० ते ७० फुट उंचीची दिपमाळ दिमाखात उभी असुन दिपमाळीच्या प्रवेश द्वारावर शके १८३६ असे कोरलेले आहे दिपमाळ शेकडो वर्षांची साक्षीदार आहे
वारीची आई जगदंबा देवी नवसाला पावणारी असल्याने या मंदिरात देशभरातून अनेक राज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात श्रद्धेने येणाऱ्या अनेक भक्तांना येथे प्राचिती आलेली आहे प्रतिवर्षी नवरात्र उत्सव मोठया उत्साहात साजरा होतो नवरात्रीतील वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून गावातील धार्मिक तरुण मंडळे देशभरातील आदिशक्तीच्या तिर्थक्षेत्रांवरून देवीची *”दिव्य ज्योत”* श्रध्दा पुर्वक गावात आणुन पुजन करुन गावात सावाद्य मिरवणुक काढली जाते त्यानंतर खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सव आरंभ केला जातो सर्व देवी ज्योत नवरात्रात मंदीरात दर्शनासाठी ठेऊन नित्यनेमाने पूजन व आरती केली जाते नवरात्रोत्सवात आणि वैशाखी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते यात्रेच्या आदल्या दिवशी देवीची छबिना ध्वज मिरवणूक होते पौर्णिमेला अभिषेक पूजन होम हवन आदी धार्मिक विधी केले जातात

जाहिरात

नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवीचा जागर केला जातो नवरात्रात अखंड भजन कीर्तन आदी कार्यक्रम होतात दसऱ्याच्या दिवशी पहाटे देवीला अभ्यंगस्नान अभिषेक पुजन केले जाते

मंदिराचा जीर्णोद्धार-

सन १९८३ साली मंदिर गर्भगृहात नविन सुरेख रेखीव अशी जगदंबादेवी माता मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मूर्ती स्थापित करण्यात आली होती सध्या जहागिरदार घराण्यातील वंशज गजेंद्र उर्फ बाबासाहेब लक्ष्मणराव पा शिंदे जहागिरदार हे या देवी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष असुन विश्वस्त अँड शरद जोशी, शरद काका संत ,पोपटराव गोर्डे,नानासाहेब नेवगे,विकास शिंदे,ज्ञानेश्वर पा टेके,रमेश सिंग राजपुत या विश्वस्त व काही तरुण सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी २०१० साली मंदिराचा कायापालट करण्याचा संकल्प केला आणि पुर्णत्वास नेऊन मंदिराचा विकास केला आहे नवरात्र उत्सवातील यात्रेत सुसूत्रता आणुन विश्वस्तमंडळ योग्य नियोजन करून वाटचाल करत आहे नवरात्रोत्सव काळात मोठया प्रमाणात मंदिरात महीला भाविक घटी बसतात या घटी बसणाऱ्या महिला भगिनीं करीता व यात्रे करूंना सर्व सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत गर्भगृहाचे व कळसाचे सुरेख काम झाले असुन भव्य दिव्य असा सभामंडप देखील नुकताच पुर्ण झाला आहे मंदीरात सुरेख अशी फरशी बसविण्यात आली आहे महाराष्ट्रातील या मंदीरात मराठी आरती बरोबरच गुजराथी आरतीचीही परंपरा वैशिष्ट्यपुर्ण असुन वर्षभर गुजराथी आरती घेतली जाते नवरात्रोत्सव काळात पहाटे ५:३० व सायंकाळी ७:०० वाजता होणाऱ्या आरतीला भाविकांची मोठी गर्दी असते वारी-साकरवाडीचे आरती मंडळ येथे नित्यनेमाने या आरतीची परंपरा आजही जपत आहेत वर्षभर मंगळवार व शुक्रवार दर्शनासाठी व आरती साठी मोठया प्रमाणात भाविक उपस्थित राहुन लाभ घेत असतात अशा पवित्र स्थळाचे एकदा दर्शन घेऊन अनुभव घ्यावा ही विनंती !
जय अंबे !
शब्दांकन
श्री अशोक कानडे
मो-९८३४८३६६२२
९७६७५६३८७७
वारी ,ता कोपरगाव जि अहमदनगर

 



संपादक:- रवींद्र जगताप
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे