आरोग्य व शिक्षण

कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे विज्ञान मंडळाचे उद्घाटन.

कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे विज्ञान मंडळाचे उद्घाटन.

 

कोपरगाव दि.अहमदनगर येथील न्यू आर्ट्स,  कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर या महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख मा. डॉ.सुधाकर कुऱ्हाडे  यांच्या हस्ते  पार पडले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ . विजय ठाणगे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र तलवारे, विज्ञान मंडळाचे सदस्य डॉ. आर. डी. गवळी डॉ.बी.एस.गायकवाड, प्रा. मिलिता वंजारे मॅडम इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. एस. गायकवाड यांनी केले आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी विज्ञान मंडळाची भूमिका आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच पक्षांच्या माध्यमातून होणारा बीज प्रसार याबद्दल  महत्त्व  विशद केले. तसेच आपल्या व्याख्यानामध्ये प्रा. डॉ . कुऱ्हाडे यांनी ‘पक्षी विविधता व त्यांचे पर्यावरणातील महत्व’ या विषयावर आपले व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भेट देऊन काढलेल्या  छायाचित्रासह विद्यार्थ्यांना पक्षांची माहिती दिली. यामध्ये पक्ष्यांच्या अंडी घालण्याच्या वेळा, पक्ष्यांचे  स्थलांतर यावरती प्रकाश टाकला. तसेच पर्यावरणामध्ये पक्षांचे महत्त्व यावरही त्यांनी आपल्या व्याखायानातून भर दिला.

जाहिरात

यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी डॉ.कुऱ्हाडे सर करत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पर्यावरणामध्ये मधमाशा आणि पक्षी हे मानवासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी विशद केले, तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा व अशा पद्धतीचा एखादा तरी छंद जोपासावा की जेणेकरून पर्यावरणाच्या संरक्षणामध्ये आणि संवर्धनामध्ये आपला हातभार लागेल. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मिलीता वंजारे मॅडम यांनी केले तर प्रा. डॉ. आर. डी. गवळी यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी  कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा. संजीवजी कुलकर्णी, ट्रस्टी संदीपजी रोहमारे व संस्थेचे पदाधिकारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.



संपादक:- रवींद्र जगताप
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे