कोपरगाव शहरात नेत्र बिंदू शिबिराला सुरुवात
कोपरगाव शहरात नेत्र बिंदू शिबिराला सुरुवात
ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचा आदर्श उपक्रम
कोपरगाव शहर : कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जेष्ठ नागरिक सेवा मंचचा पुन्हा एकदा आदर्श असा उपक्रम कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समितीच्या वतीने व ठोळे उद्योग समुहाच्या मदतीने इंडोर गेम हॉल जवळ रिकब शिंगी परिवाराच्या सौजन्याने सुरू करण्यात आलेल्या धर्मार्थ मोफत दवाखान्यात अल्प दरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. अहिल्या नगर येथील आनंद ऋषी नेत्रालयाच्या सहकार्याने प्रत्येक महिन्याच्या – तिसऱ्या सोमवारी अल्प दरात मोतीबिंदू तपासणी व उपचार शिबीरास उद्योजक कैलासचंद ठोळे, रिकब शेठ शिंगी, मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे, महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी आदिंचौ उपस्थित करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक डॉ विलास आचारी, कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले. समारंभासाठी मंचचे ऊत्तम भाई शहा, बापुसाहेब ईनामके, पेंटर महंमद दारुवाला, ह भ प साबळे महाराज यांच्यासह सभासद उपस्थित होते. आनंद ऋषी नेत्रालयाचया वतीने डॉ महेश गायके, सुशील गाडेकर, सागर देवकर, भाऊसाहेब आदमाने यांनी सहकार्य केले. नेत्र तपासणी साठी शहर व ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक सेवा मंच कोपरगाव शहरात विविध सामाजिक काम करत असते धार्मिक सामाजिक अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गोरगरिबांना ते मदत करत असतात नेत्रबिंदू शिबिराचे आयोजन करून अनेक गरजू नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.




संपादक :- रवींद्र जगताप
संपादक :- रवींद्र जगताप

