कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेत्रदान संपन्न
कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेत्रदान संपन्न
कोपरगाव:- सगळीकडे दिवाळी ची धामधूम सुरू असून पणती पेटवून हा सण सर्वजण साजरा करतात परंतु दुसऱ्याच्या आयुष्यातील अंधार दूर करुन त्यांच् आयुष्य प्रकाशमय करून मृत्यू नंतर स्वतःच नेत्रदान करून दोन अंध व्यक्ती च आयुष्य प्रकाशमय करून त्यांच्या आयुष्यातील अंधकार कायमचा दूर करण्याच काम माहेगाव देशमुख येथील श्री चारुदत्त ढेकणे यांनी केलं आहे


,ते व त्यांच्या पत्नी पुणे येथे कर सल्लागार म्हणून काम करत होत्या दीपावली निमित्त ते त्यांच्या मूळ गावी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आले असता सकाळी मॉर्निग वॉक करत असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला परंतु त्यांना आपल्या मृत्यू नंतर नेत्रदान करायच आहे ही इच्छा त्यांनी त्यांच्या घरच्याना सांगितली होती मृत्यू नंतर त्यांचा पत्नी ने ही गोष्ट सांगितली

यावर त्वरित त्यांचा मृतदेह त्वरीत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आला व नेत्रदान तसेच अवयवदान, देहदान समुपदेशक ,ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ अशोक गावित्रे यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्यांनी संपूर्ण प्रक्रिया करून त्यांचं नेत्रदान करून घेतले यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ गिरीश गिटे ,डॉ हूलारे ,डॉ आतिष काळे, तोसिफ शेख,विक्रम वाल्मिक तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या डॉ अनन्या ,डॉ हिमानी तसेच माहेगाव देशमुख येथील ग्रामस्थ श्री उल्लास काळे, रवींद्र काळे, दत्तत्रय काळे, सचीन देशमुख, बारकू चोथे,भाऊ जीवन ढेकणे ,मुलगा ओंकार, पत्नी सुचेता ढेकणे इ सहकार्य लाभले त्यांच्या या कार्यच सर्व स्तरातील कोतुक होत आहे मरावे परी नेत्ररूपी उरावी हे वाक्य त्यांनी सार्थक करुन दाखवले







