आरोग्य व शिक्षण

कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे चित्रपट व नाट्यग्रह 100% क्षमतेने सुरू करण्यास द्यावी परवानगी डाॅ.अशोक गावित्रे

 

हेमंत शेजवळ
शिर्डी (प्रतिनिधी)सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असून आता कोरोना हा नामशेष होण्याच्या मार्गावर आला असल्याने कोरोना संदर्भातल्या अटी व शर्ती कमी करून चित्रपट,नाट्यग्रह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना आता शासनाने शंभर टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सास्कृतिक विभागाचे प्रदेश चिटणीस डाॅ.अशोक गावित्रे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.काही दिवसापूर्वी कोरोणाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे शासनाने कोरोना संदर्भात अटी व शर्ती लागू केल्या होत्या.या अटी व शर्ती आता‌ हळुहळू कमी होत असल्या तरी चित्रपटगृहे,नाट्यगृहे फक्त 50% क्षमतेने सुरू आहेत. मात्र त्यामुळे चित्रपटगृहे नाट्यगृहे निर्माता,कलाकार,यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. या सत्रामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे मोठ्या संख्येने लोक आहेत.त्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.त्याचबरोबर तमाशा व तत्सम कला, सांस्कृतिक कार्यक्रम यांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असल्यामुळे अटी व शर्ती कमी करत चित्रपटगृहे, नाट्यगृहे,तमाशा व अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना शंभर टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास आता शासनाने परवानगी द्यावी.अशी मागणी आता नागरिक व सिने शौकीनांकडुन,व या क्षेत्रातील कलाकारांकडून होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे