देश-विदेश

लोकतंत्रावर पडणारा दबाव कमी करण्याच्या उद्देशाने प्रेस कौन्सिलची स्थापना करण्यात आली असून त्याच्या अंमलबजावणीचा दिवस म्हणून राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात येतो= शेख बरकत अली

लोकतंत्रावर पडणारा दबाव कमी करण्याच्या उद्देशाने प्रेस कौन्सिलची स्थापना करण्यात आली असून त्याच्या अंमलबजावणीचा दिवस म्हणून राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात येतो= शेख बरकत अली

लोकतंत्रावर पडणारा दबाव कमी करून त्याचे संरक्षण व्हावे या हेतूने 4जुलाई सन 1966 साली प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली असून 16 नोव्हेंबर 1966 रोजी त्यास अमलात आणले गेले असल्याने 16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे पत्रकारिता लोकतंत्राचा चौथा स्तंभ असल्याने पत्रकारितेला अत्यंत महत्व असून पत्रकार हा समाज व प्रशासनाच्या मधला दुवा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी केले

जाहिरात
जाहिरात

16 नोव्हेंबर 2022 रोजी श्रीरामपूर येथील पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालया जवळ दुपारी 2=00 वाजता राष्ट्रीय पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष व रुग्णमित्र श्री सुभाषराव गायकवाड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शेख बरकत अली, ज्येष्ठ पत्रकार अमीन भाई शेख, पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद, प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार, नाशिक जिल्हा अध्यक्ष उस्मान भाई शेख, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी केले तर प्रास्ताविक कोपरगाव तालुका अध्यक्ष रवींद्र जगताप यांनी केले

जाहिरात

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाला तीस वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून माहे डिसेंबर 2022रोजी पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव साजरा करणे करिता तारीख ठरविणे तसेच पत्रकार संघावर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे नवीन सदस्यांना ओळखपत्र प्रदान करणे आदि उद्देशाने कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री अमीर भाई जहागीरदार, आर. के. न्यूजचे संपादक राहुल कोळगे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, नाशिक जिल्हा अध्यक्ष उस्मान भाई शेख, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव केदारे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई पठाण, सतर्क पोलीस टाईम चे प्रतिनिधी रहीम खान, न्यू मुळा प्रवरा चे संपादक गुलाब भाई शेख, ज्येष्ठ पत्रकार अमीन भाई शेख, पत्रकार संघाचे उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम भाई शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद आदी लोकांनी मार्गदर्शनपर भाषणे केली

जाहिरात

यावेळी एस. एस. न्यूज चे उपसंपादक जावेद भाई शेख यांची राहुरी शहराध्यक्ष पदावर निवड करण्यात आली याच बरोबर कोपरगाव येथील पत्रकार रहीम खान व येवला येथील फईम सय्यद यांची पत्रकार संघाच्या सदस्य पदी निवड करण्यात आली पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव साजरा करने करिता 25 डिसेंबर 2022 ही तारीख सर्वानुमते पक्की करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष शेख भरत अली यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांना कार्यक्रमाच्या तयारीस लागण्याची सूचना दिली

यावेळी उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या बेलापूर येथील एजाज सय्यद, रामगड येथील राज महंमद शेख, येवला येथील अबूजर शेख, चांदवड येथील सुखदेव केदारे, पाटोदा येथील सखाराम पगारे, कोपरगाव येथील रवींद्र जगताप,कचरु लोहकरे, शिर्डी येथील राहुल कोळगे, श्रीरामपूर येथील गुलाब भाई शेख, चांदवड येथील मन्सूर भाई पठाण, येवला येथील प्रकाश मालोवकर आदी पत्रकारांना पत्रकार संघाचे वतीने स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले

आपल्या प्रमुख भाषणात शेख बरकत अली पुढे म्हणाले की पत्रकारिता करणे सोपे नाही पत्रकारांना समाजातील लोकांच्या चांगल्या किंवा वाईट बातम्या प्रसिद्ध कराव्या लागतात चांगली बातमी प्रसिद्ध केल्यास पत्रकाराची वाह वाह होते मात्र एखाद्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध किंवा अपप्रवृत्तीविरुद्ध बातमी प्रसिद्ध केल्यास त्या व्यक्तीची तळपायाची आग मस्तकाला चढते आणि अशी व्यक्ती पत्रकाराला मारहाण करणे पत्रकाराच्या कार्यालयाची तोड फोड करणे किंवा पत्रकाराला जीवे ठार मारणे अशी कृत्य करतात हे प्रकार लक्षात घेता आणि पत्रकार संघाच्या संरक्षणाबाबत वारंवार होणाऱ्या मागण्या याला प्रतिसाद देणे करिता शासनाने पत्रकार संरक्षण कायदा संमत केला व सध्या या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे यामुळे अपप्रवृत्तीच्या लोकांवर पत्रकारांचे अंकुश बसेल हे सत्य आहे परंतु पत्रकारां विरुद्ध मानहानीचे दावे, खंडणीचे दावे दाखल होतात यावेळी तो पत्रकार एकटा पडतो त्याला त्याचे नातेवाईक किंवा त्याचे मित्र साथ देत नाहीत अशा वेळेस त्या पत्रकारास अडचणीतून बाहेर काढण्याकरिता पत्रकार संघ आहे पत्रकार संघ हा पत्रकारांचा सुरक्षा कवच आहे यामुळे पत्रकारांनी निर्भीडपणे पत्रकारिता करावी परंतु बातमी प्रसिद्ध करताना बातमीची पडताळणी करून व सत्यता पाहून बातमी प्रसिद्ध केल्यास येणाऱ्या अडचणी पत्रकारांसमोर उभ्या ठाकणार नाहीत असे त्यांनी यावेळी सांगितले

जाहिराती

कार्यक्रमास रियाज खान पठाण, मयूर मळठणकर, इब्राहिम भाई शेख, कचरू लोहकरे, मन्सूर भाई शेख, मोहम्मद गौरी, मोहम्मद अली सय्यद, मुसा भाई सय्यद, साजिद भाई शेख, अनिस भाई शेख, अनिल खरात, संदिप गोरे, अनिलगांगुर्डे ,नवनाथ खुरसणे, माधव सोळशे, गणेश गागरे आदींसह इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित पत्रकारांचे आभार पत्रकार संघाचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद यांनी मानले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे