देश-विदेश

कोपरगावचे रहिवासी असलेले हार्यकोर्टचे विधिज्ञ झोडगे यांनी    सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश मा. भुषण गवई साहेब यांच्या शपथविधीला उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा !

कोपरगावचे रहिवासी असलेले हार्यकोर्टचे विधिज्ञ झोडगे यांनी    सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश मा. भुषण गवई साहेब यांच्या शपथविधीला उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा !

 

कोपरगाव प्रतिनिधी :-  भारताच्या सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश मा भुषण गवई साहेब यांचा शपथविधी सोहळा नुकताच  दिल्ली येथे पार पडला,या सोहळ्यासाठी देशभरातुन ठराविक मान्यवर उपस्थित होते.यात महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संभाजीनगर हायकोर्टचे विधीज्ञ अजित झोडगे हे देखील उपस्थित होते.या सुवर्ण क्षणांना ह्रदयाच्या कप्प्यात कैद करण्याची संधी मिळाली त्यांना मिळाली.या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून  गवई साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ  धोरडे साहेब, ज्येष्ठ विधिज्ञ  होन साहेब, मुख्य सरकारी वकील औरंगाबाद खंडपीठ  अमरजितसिंग गिरासे साहेब, ज्येष्ठ विधिज्ञ व्ही डी साळुंखे ,ज्येष्ठ विधिज्ञ महेश देशमुख , ज्येष्ठ विधिज्ञ राहुल कर्पे, ज्येष्ठ विधिज्ञ ज्ञानेश्वर बागुल  ऍड सुधिर आखाडे उपस्थित होते.सायंकाळी भारताचे सरन्यायाधीश मा गवई साहेबांच्या निवासस्थानी स्नेहभोजन या सर्वांनी घेतले, त्यानिमित्ताने गवई साहेब आणि त्यांच्या मातोश्री व कुटुंबियांसमवेत संवाद साधण्याची संधी मिळाली.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे