कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील बहादरपुर येथे शिवसेना शाखेचे नुतनीकरण
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील बहादरपुर येथे शिवसेना शाखेचे नुतनीकरण
कोपरगाव:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील बहादरपुर येथे शिवसेना शाखेचे नुतनीकरण करून शुभारंभ वाजत गाजत फटाकेच्या आतशबाजी .विजयाचे घोषणा देऊन करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय . हिंदुह्रदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.उध्दवसाहेब ठाकरे.अदित्यसाहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. अशा घोषणांनी परिसरात व बहादरपुर गावात भगवे झेंडे लावुन वातावरण भगवेमय करून नवचैतन्य निर्माण झाले होते.


बहादरपुरचे सुपुत्र कै दशरथभाऊ रहाणे यांचे बंधू हल्ली मुक्काम मुंबई येथे मलबार हिल शिवसेना तालुकाप्रमुख कट्टर निष्ठावंत शिवसैनिक. वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले.बालदशे पासुन कॉलेज जिवणा पर्यंत विद्यार्थी सेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख या पदावर कार्य केलेले .आमचे गेली 30 वर्षे मित्रत्वाचे .नाते रक्ता पलीकडचे .नाते शिवबंधानाचे जिवलग मित्र शिवसेना पक्ष सहकारी आमचे मार्गदर्शक.गेली 40 वर्ष शिवसेना पक्षाची एकनिष्ठ पणे संघटना वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेऊन निस्वार्थ पणे कार्य करणारे.तसेच शिवसेना पक्षावर आलेले राजकीय संकाटाचे काळात शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके माजी मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे.युवासेनाप्रमुख आ अदित्यसाहेब ठाकरे .यांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहुन मुंबई येथे शिवसेना पक्षाचे संघटन वाढवत असताना त्याबरोबरच आपले जन्मभुमीत कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे शिवसेना पक्षाचे संघटन वाढावे म्हणून कार्य करणारे श्री शिवाजीराजे रहाणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज बहादरपुर येथे शिवसेना नामफलकाचे व शाखेचे नुतनीकरण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी व भावी खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात फटाके.वाजंत्री . सह वाजतगाजत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर रहाणे यांनी करून.तसेच उपस्थित प्रमुख पाहुणेंचा सत्कारासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी वाकचौरे साहेब यांच्या सह शिवाजी रहाणे.सुहास वहाडणे .प्रमोद लबडे.भरत मोरे.सनी वाघ.यांचे सह अनेक मान्यवरांनी आपले भाषणात शिवसेना एकसंध आहे .व येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार म्हणून श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेब हे मोठे मताधिक्याने विजयी होणार आहे असा विश्वास व्यक्त केला..विजयाचा पहिला शुभारंभ व विजयाचा पहिला सत्कार श्री संत सद्गुरू गोपाजी महाराज संजीवन समाधी मंदिर यांच्या आशीर्वादानेच करुन बहादरपुर येथे घेण्यात येईल असे सांगुन.गद्दांराना धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी जागृत रहावे.तसेच शिवसेना पक्षप्रमुख लोकप्रिय लाडके माजी मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख माजीमंत्री आ अदित्यसाहेब ठाकरे यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देत असताना केलेले कार्य . कोरोणा महामारीत मदत केंद्र .व शेतकरी बांधवांना पीककर्ज सरसगट दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी करुन न्याय दिला .पिकविमा.अवकाळी . किंवा अतिवृष्टी चे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना शासनाचे वतीने त्वरीत नुकसान भरपाई देऊन.दुध खरेदी दर 35 ते 38 रुपये करुन दुध उत्पादक बांधवांना दिलासा दिला होता.अशा एक अनेक कामांची यादी प्रसिद्ध करून . उध्दवसाहेब ठाकरे यांचे काळातील कार्य जनते पर्यंत पोहचवावे.असे शिवाजी रहाणे यांनी मार्गदर्शन करतानी त्यांचे सह बहादरपुर येथील जेष्ठ शिवसैनिकांनी 1992 ला गावात स्थापन केलेली शिवसेनेच्या शाखेच्या आठवणींना उजाळा देऊन समाजातील वंचित गोरगरीब शालेय विद्यार्थी.विध्यारथीनी यांच्या भविष्यातील सरकारी शाळेचे झालेले खाजगीकरण या विरोधात आपण आवाज उठवण्यासाठी एकसंघ राहाणे गरजेचे आहे.आजचे सरकार हे सुडबुध्दीचे राजकारण करत आहे.त्याकरीता आपण समाजातील सुक्षिशित होतकरू युवक युवती यांच्या शालेय कॉलेज जिवणातील अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण तत्पर राहुन त्यांचे न्याय्य हक्कांसाठी लढणारे स्वाभिमानी शिवसैनिक ग्रामीण भागात तयार करण्यासाठी गाव तेथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक तयार करण्यासाठी प्रयत्नशील रहावे . त्यासाठी आम्ही वरीष्ठ तुमचे पाठीशी आहोत.युवासेना व शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी.गावकरी .यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी नुकतेच समाजभुषण पुरस्काराचे मानकरी कट्टर निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिक लढावु वृत्तीचे पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा उत्तरनगर जिल्हा शिव आरोग्य सेना सचिव महेश कुलकर्णी यांचा भगवी शाल पुष्पगुच्छ देऊन बहादरपुर युवासेना .शिवसेना शाखेचे वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी व भावी खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेब.राजेद्र झावरे.प्रमोद लबडे. सुहास वहाडणे. श्रीरंग चांदगुडे.संजय शिंदे.भरत मोरे. मनोज कपोटे.प्रविण शिंदे.औताडे भाऊ.यांचे सह अनेक उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास .राहुल होन .असलम शेख. शिवाजी रोहमारे नवनाथ औताडे.राजु शेख.मुकुंद सिनगर. कलविंदर दडियाल .विकास शर्मा.किरण खर्डे.इरफान शेख. पुणतांबा येथील जन्मजात कट्टर निष्ठावंत बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी.सामाजीक कार्यकर्ते सचिन धनवटे.यांचे सह शिवसेना. युवासेना.कार्यकर्ते. पदाधिकारी.. गावकरी जेष्ठ नागरिक आजुबाजुला बसलेल्या माता. भगिनी.महिलामंडळ. बहादरपुर युवासेना व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना शाखाप्रमुख वामन रहाणे.उपशाखाप्रमुख बबन रहाणे.युवासेना शाखाप्रमुख निखिल पवार.उपशाखाप्रमुख निखिल रहाणे.संघटक किरण रहाणे.सचिव वैभव सोनवणे. खजिनदार किशोर रहाणे. सोशल मीडिया प्रमुख पाराजी रहाणे.शिवसेना सचिव कैलास रहाणे.संघटक विजय रहाणे.गंगाधर रहाणे.युवासेना संघटक सागर रहाणे.शिवसेना संघटक रामनाथ रहाणे.यांचे सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.सूत्रसंचालन गंगाधर रहाणे यांनी केले.तर आभार प्रदर्शन विजय रहाणे यांनी केले.



