भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची बदनामी केल्याप्रकरणी चौकशी करुन संबधितावर कारवाई करावी
कोपरगाव प्रतिनिधी :-भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची तृप्ती देसाई नामक महिलेने अक्षेपार्ह व्हिडीओ व वेगवेगळ्या प्रसार माध्यमांव्दारे बदनामी कारक माहिती प्रसारीत करून पक्षाची व पक्षातील पदाधिकारी श्री. नितीन दिनकर यांची प्रतिमा मलीन केली आहे. तरी सदर घटनेची पोलींसामार्फत योग्य चौकशी होवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा कारवाई न झाल्यास सर्व कार्यकर्ते प्रशासनाविरोधात तिव्र आंदोलन छेडणार जाईल यासाठी कोपरगाव शहर पोलिस स्टशनला निवेदन दिले आहे.शरद त्रिभुवण शंकर बिर्हाडे सुजल चंदनशिव यांनी निवेदनात म्हटले आहे की,या प्रकरणात चौकशी करुन कारवाई करावी अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन वेडी असा इशारा दिला आहे.




