आरोग्य व शिक्षण

रांजणगाव देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकाच वेळी ४ शिक्षकांची बदलीने पालक वर्गात संतापाची लाट

रांजणगाव देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकाच वेळी ४ शिक्षकांची बदलीने पालक वर्गात संतापाची लाट

एकीकडे इग्रजी माध्यामाच्या शाळामुळे मराठी शाळा तसेच जिल्हा परिषदेचे शाळा बंद पडत चालल्या आहे. विद्यार्थ्यांचा पट देखील कमी होत आहे.राजणगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकाच वेळी ४ शिक्षकांची बदलीच्या वृत्ताने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार राजणगाव देशमुख तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक संतोष रहाटळ,यांच्यासह उनवणे ,कोकाटे,ढोकळ या शिक्षकांची बदली झाली आहे.या शिक्षकांनी या प्राथमिक शाळेत विद्यार्थींना अंत्यत दर्जेदार शिक्षण देवून विद्यार्थी व पालकांमध्ये जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण केले.त्यामुळे पालकांनी या शाळेत आपले मुलांचे प्रवेश घेतले.परंतु एकाच वेळी सर्वच शिक्षकांची बदली होत असुन आपल्या पाल्याचे भविष्य धोक्यात तर येणार नाही अशी काळजी पालकांना पडली आहे.यामुळे पालकामध्ये तिव्र नाराजी पसरली आहे.आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी पालक आंदोलनाच्या तयारीत असुन शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा पालक ग्रामस्थ यांनी दिला आहे.विद्यार्थ्यांनमध्ये देखील आपल्या शिक्षकांची बदली होणार म्हणून अस्वस्थता पसरली आहे. रांजणगाव देशमुख जिल्हा प्राथमिक शाळेतील या शिक्षकांच्या बदल्याच्या निर्णयाला पालकांचा तीव्र विरोध आहे अचानक झालेल्या या बदल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे पालकांनी म्हटले आहे त्यामुळे या शिक्षकांच्या बदल्या थांबविण्यात याव्या अशी पालकांची इच्छा आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे