राजकिय

गंगाधरांच्या आठवणींचा आधार घेत…” प्रभाग ९ मध्ये अंजनाताई फडे यांची हृदयस्पर्शी एन्ट्री

गंगाधरांच्या आठवणींचा आधार घेत…”
प्रभाग ९ मध्ये अंजनाताई फडे यांची हृदयस्पर्शी एन्ट्री

कोपरगाव :- -प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय वातावरण आज भावनिक क्षणांनी भारले. कै. गंगाधर फडे यांचे नाव प्रभागात आजही आदराने घेतले जाते. त्यांच्याच कार्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती अंजनाताई गंगाधर फडे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याची माहिती मिळताच प्रभागात एक वेगळीच भावना निर्माण झाली.

जाहिरात

गंगाधर फडे यांच्या अकस्मात निधनानंतर अनेकांनी “आपला आधार गेला” असेच मानले होते. परंतु आज त्याच घरातून पुन्हा एकदा लोकांसाठी काम करण्याचा संकल्प घेऊन अंजनाताई पुढे आल्या आहेत. साध्या, शांत आणि लोकांशी आत्मीयतेने वागणाऱ्या अंजनाताईंच्या निर्णयाने प्रभागातील अनेकांच्या डोळ्यांत पाणी तर, मनात नव्या आशेची ज्योत पेटली.“गंगाधरांनी लोकांसाठी जे स्वप्न पाहिले, ते अपूर्ण राहू देणार नाही,” अशी भावना अंजना ताईंनी व्यक्त केले आहे. निर्णय घेताच परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग भेटी घेत आहेत.
“गंगाधरांच्या स्मृतीचा मान राखण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असा विश्वास देखील उपस्थित नागरिकांनी फडे परिवाराला दिला आहे.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सुरक्षा आणि स्थानिक विकासाच्या अपूर्ण कामांना गती देण्याचा अंजनाताईंचा विश्वास प्रभागातील नागरिकांनी मनापासून स्वीकारला आहे.गंगाधर फडे यांनी उभारलेली जनविश्वासाची परंपरा अंजनाताई पुढे नेतील यात शंकाच नाही. उमेदवारी बाबत फडे परिवाराने घेतलेला निर्णयामुळे प्रभाक मध्ये प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे