राजकिय

नागरिकांच्या हाकेला धावणारा अशी ओळख असलेला गोरख देवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नागरिकांच्या हाकेला धावणारा अशी ओळख असलेला गोरख देवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी अनेकांनी आपली कंबर कसली आहे यंदाची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होणार असुन शहरामध्ये काळे कोल्हे यांचा संघर्ष तर इतर अनेक पक्ष यावेळी रिंगणामध्ये उतरले आहेत त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये दुरंगी तिरंगी चौरंगी लढत आपणास पाहावयास मिळणार आहे. त्यातच प्रभाग क्रमांक ८ मध्ये (सर्वसाधारण) गोरख देवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गोरख देवडे यांच्या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये मोठी लढत पाहावयास मिळणार आहे गोरख देवडे यांचा गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक कामाचा अनुभव आहे या प्रभागातील नागरिकांच्या अनेक समस्या प्रश्न त्यानी सोडविले आहे मागासवर्गीय समाजासाठी ते नेहमी पुढाकार घेऊन गोरगरीब शोषित पीडित वंचित अशा सर्व स्तरावर सर्वच नागरिकांसाठी ते कामकाज करत असतात भारतीय जनता पार्टी मध्ये देखील त्यांनी विविध पदावर काम केलेले आहे ओबीसी समाजाच्या प्रश्नासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने निवेदने देऊन ओबीसींच्या प्रश्नासाठी हक्कासाठी आवाज त्यांनी उठविला आहे त्यामुळे गोरख देवडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक आठ मध्ये निवडणुकी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यांच्या कामाचा धडाका पाहून नागरिकांनी देखील त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा व निवडणूक लढवून नागरिकांच्या समस्या सोडवाव्या असे नागरिकांनी म्हटले आहे त्यामुळे नागरिकांनीच पुढाकार घेऊन गोरख देवडे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास भाग पाडले आहे

जाहिरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे