आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजन

एम.बी.ए. प्रवेश व करिअर संधींवर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

एम.बी.ए. प्रवेश व करिअर संधींवर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

कोपरगाव, दि. २९ (वार्ताहर) रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे एम.बी.ए. प्रवेश प्रक्रिया, मुलाखत तंत्र व करिअरच्या विविध संधी याविषयी मार्गदर्शनपर विशेष कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. रयत स्पर्धा परीक्षा अकादमी, वाणिज्य संघटना, करिअर मार्गदर्शन व नियोजन विभाग तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. कृष्णा थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना थोरात यांनी सांगितले की, एम.बी.ए. प्रवेशासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर CAT, CMAT, МАН-МВА-СЕТ, XAT, MAT अशा विविध प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये तर्कशक्ती, संख्यात्मक क्षमता, भाषिक कौशल्ये व डेटा विश्लेषण यांचे मूल्यमापन होते. प्रवेश परीक्षेनंतर समूहचर्चा, वैयक्तिक मुलाखत व शैक्षणिक कामगिरीच्या आधारे अंतिम निवड केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास, वेळेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सरावावर भर द्यावा, असे त्यांनी नमूद केले.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी स्वपरिचय पत्राचे महत्त्व विशद केले. स्वपरिचय पत्र हे उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे, उद्दिष्टांचे व क्षमतांचे प्रतिबिंब असून प्रवेश प्रक्रिया व मुलाखतीत ते पहिला प्रभाव निर्माण करते. त्यामुळे ते अभ्यासपूर्ण, प्रामाणिक व प्रभावी असावे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे वाणिज्य विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत यांनी केले. या प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तहाळ, प्रा. महेश दिघे, प्रा. दिलीप भोये, प्रा. किरण पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. सीमा दाभाडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील काकडे व प्रा. तृप्ती कुलथे यांनी केले.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे