कोपरगाव रेल्वे स्थानकाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव द्यावे..! सौ.सोनल चोरगे

कोपरगाव रेल्वे स्थानकाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव द्यावे..! सौ.सोनल चोरगे
संस्थापक अध्यक्ष कै.वसंतदादा स्मृती प्रतिष्ठान कोपरगाव
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना इमेल निवेदनाद्वारे सौ.सोनल चोरगे यांची मागणी
कोपरगाव:- कै.वसंतदादा स्मृती प्रतिष्ठान यांनी मागणी केली आहे कि कोपरगाव रेल्वे स्थानकाला महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव द्यावे
कारण महानुभाव पंथाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील उत्तर अहिल्यानगर या जिल्ह्यातील सिन्नर खोपडी पुणतांबा श्रीरामपूर कोपरगाव (संवत्सर) सोनारी कोकमठाण सुरेगाव येथे अनेक दिवस वास्तवाला होते कोपरगाव हे महानुभाव पंथांतील महास्थान आहे
त्याकाळी अस्पृश्यता जातीभेद चरमसिमेवर होता जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अस्पृश्यता नष्ट करून समानतेचा मानवतेचा संदेश दिला व स्पृश्य अस्पृश्य श्रेष्ठ कनिष्ट उच्च निच्च हा भेदभाव नष्ट केला
महाराष्ट्रातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे कार्य महान आहे महानुभाव पंथात मराठीचा आद्य ग्रंथ विळा चरित्र आहे ह्या ग्रंथात मुळे एक प्राचिन भाषा वाचली
असल्या अलौकिक कार्याने महाराष्ट्रातील सामाजिक आध्यात्मिक सांस्कृतिक संस्कृती वाचली आणि या सर्वांच श्रेय महानुभाव पंथाचे आराध्य दैवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे मुळे घडले कोपरगाव शहरात तालुक्यात आज हि अनेक महानुभाव पंथाचे स्थान आहे अनुयायी आहे ८५० वर्षापुर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी येथे येऊन वास्तव्य करून मानवतेचा संदेश दिला धर्म पंथ आणि मानवता वाचवली असल्या महान ईश्वराचे नाव कोपरगाव रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी महिला सामाजिक कार्यकर्त्या तसेच कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सौ.सोनल चोरगे यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना इमेल निवेदना व्दारे केली आहे





